सुशांतला मृतावस्थेत पाहून जोरात किंचाळली होती बहिण, तिच्या तोंडून निघाले होते हे पाच शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 12:45 IST2020-08-24T12:45:07+5:302020-08-24T12:45:27+5:30

सुशांतच्या निधनाच्या वेळी त्याच्या घरात चार जण उपस्थित होते. यात सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंग आणि हेल्पर दिपेश यांनीच सर्वात पहिला त्याला मृतावस्थेत पाहिले होते.

Sister had screamed loudly when she saw Sushant dead, these five words came out of her mouth | सुशांतला मृतावस्थेत पाहून जोरात किंचाळली होती बहिण, तिच्या तोंडून निघाले होते हे पाच शब्द

सुशांतला मृतावस्थेत पाहून जोरात किंचाळली होती बहिण, तिच्या तोंडून निघाले होते हे पाच शब्द

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले असून आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. सुशांतच्या निधनाच्या वेळी त्याच्या घरात चार जण उपस्थित होते. यात सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंग आणि हेल्पर दिपेश यांनीच सर्वात पहिला त्याला मृतावस्थेत पाहिले होते. सुशांतला मृतावस्थेत पाहून त्याची बहिण मीतू हिच्या तोंडून काय निघाले याचा खुलासा कुक नीरजने केला आहे.


एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरजने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले होते की, 14 जून रोजी सुशांत सरांनी मला थंड पाणी घेऊन यायला सांगितले. मी पटकन जाऊन थंड पाणी घेऊन आलो. ते म्हणाले सर्व ठीक आहे आहे ना खाली. मी म्हटलं हो सर सगळं ठीक आहे. मग ते त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर मी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला पण आतून कोणताच रिप्लाय आला नाही. अर्धा तास उलटून गेला. नंतर शेफ गेला. त्याने दोन वेळा त्याला कॉल केला. रिंग वाजत होती पण रिप्लाय आला नाही.


नीरज पुढे म्हणाला की, आम्ही चावीवाल्याला कॉल करून बोलवून घेतले. त्याने लॉक तोडले तर पाच मिनिटं आणि चावी बनवली तर एक तास लागणार असे सांगितले. सिद्धार्थ पिठानीने दरवाजा तोडायला सांगितला. मी त्याला दोन हजार रुपये कॅश दिले आणि त्याला जायला सांगितले.


नीरजच्या स्टेटमेंटनुसार दिपेश आणि त्यांनी दरवाजा खोलला तेव्हा खूप अंधार होता. रुममधील एसी चालू होता. दिपेश खोलीतील लाइट चालू केली. खोलीत सुशांत सरांनी हिरव्या रंगाच्या कपड्याने पंख्याला गळफास लावून घेतला होता. नीरज म्हणाला की, सिद्धार्थने सुशांत सरांची बहिण मीतू यांना फोन करून सांगितले. त्यानंतर सिद्धार्थने मला सांगितले की सुरीने कपडा काप. त्यांचा मृतदेह बेडवर होता आणि पाय बाहेर होते.


नीरजच्या माहितीनुसार मीतू सिंग जशी खोलीत आली तर ती जोरात किंचाळली. किंचाळत म्हणाली की, गुलशन तू हे काय केलेस? मीतूने त्यानंतर सुशांतचा मृतदेह बेडवर व्यवस्थित ठेवला. त्याच्या गळ्याभोवतीचा हिरव्या रंगाचा कुर्ता काढला. हा कुर्ता सुशांत सरांनी घरी पूजेदरम्यान परिधान केला होता. नीरजने सांगितले की सुशांतची छातीदेखील दाबून पाहिली होती.

Web Title: Sister had screamed loudly when she saw Sushant dead, these five words came out of her mouth