देवसेना अनुष्का शेट्टीला लॉन्च करण्यासाठी श्रीदेवीने कसली कंबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 14:21 IST2017-05-17T08:51:01+5:302017-05-17T14:21:32+5:30

‘बाहुबली-२’मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाºया अभिनेत्री अनुष्का शेट्टीने बॉलिवूड निर्मात्यांवरही अक्षरश: मोहिनी घातली आहे. त्यामुळे आज बॉलिवूडमधील ...

Sister Devi waits to launch DevSena Anushka Shetty! | देवसेना अनुष्का शेट्टीला लॉन्च करण्यासाठी श्रीदेवीने कसली कंबर!

देवसेना अनुष्का शेट्टीला लॉन्च करण्यासाठी श्रीदेवीने कसली कंबर!

ाहुबली-२’मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाºया अभिनेत्री अनुष्का शेट्टीने बॉलिवूड निर्मात्यांवरही अक्षरश: मोहिनी घातली आहे. त्यामुळे आज बॉलिवूडमधील प्रत्येक निर्माता तिला लॉन्च करण्यासाठी उत्सुक आहे. अनेक बडे निर्माते या रांगेत उभे असून, त्यात आघाडीवर निर्माता बोनी कपूर यांचे नाव घेतले जात आहे. वास्तविक बोनी कपूर हे जर पुढे दिसत असले तरी, पडद्यामागून त्यांची पत्नी श्रीदेवी भूमिका पार पाडताना दिसत आहे. वृत्तानुसार श्रीदेवीने अनुष्काला लॉन्च करण्यासाठी जणूकाही प्रतिष्ठेचा विषय बनविला असून, ती सातत्याने तिच्या संपर्कात असल्याचे समजते. 

‘बाहुबली-२ : द कन्क्लूजन’मध्ये अनुष्का एका महत्त्वपूर्ण आणि दमदार भूमिकेत बघावयास मिळाली. हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये तर अनुष्काने एक वेगळीच छाप सोडली आहे. पडद्यावरील तिची एक झलक बघण्यासाठी फॅन्स अक्षरश: आतुर झाले आहेत. अशात बॉलिवूड निर्माते याकडे संधी म्हणून बघत असून, तिला लॉन्च करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. 



अनुष्काने ‘बाहुबली-२’मध्ये देवसेना ही भूमिका साकारली आहे. बाहुबलीच्या पहिल्या भागात अभिनयाला फारशी संधी मिळाली नसलेल्या अनुष्काने त्याची संपूर्ण कसर दुसºया भागात काढली आहे. तिची दमदार भूमिका प्रेक्षकांना अक्षरश: घायाळ ठरणारी असल्याने ती बॉलिवूडमध्ये दमदार आगमन करेल, अशी अपेक्षा निर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बोनी कपूर सध्या अनुष्काला लॉन्च करण्यासाठी धडपड करीत आहेत. 

त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली असून, फक्त अनुष्काच्या होकाराची प्रतीक्षा आहे. अशात बोनी कपूर यांची पत्नी श्रीदेवी हीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, अनुष्काच्या होकाराची जबाबदारी तिच्यावर सोपविल्याची माहिती समोर येत आहे. श्रीदेवीने बॉलिवूडबरोबर अनेक साउथ चित्रपटांमध्ये दमदार भूमिका सकारल्या आहेत. शिवाय बाहुबलीमध्येच तिला शिवगामीची भूमिका आॅफर केली होती. मात्र काही कारणास्तव हा योग जुळून आला नाही. 



परंतु अनुष्काला आपल्या बॅनरअंतर्गत बनविल्या जाणाºया चित्रपटात लॉन्च करण्याची संधी श्रीदेवी सोडू इच्छित नाही. सध्या ती तिच्या होकारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना बघावयास मिळत आहे. दरम्यान, बोनी कपूर व्यतिरिक्त आदित्य चोपडा आणि विदू विनोद चोपडा हेदेखील अनुष्काला लॉन्च करण्यासाठी धडपड करीत आहेत. 

Web Title: Sister Devi waits to launch DevSena Anushka Shetty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.