"प्रेमासाठी मी खूप वेळ वाट पाहिली, पण...", अर्जुन कपूरने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "गेली ५ वर्ष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:03 IST2024-12-10T09:03:28+5:302024-12-10T09:03:46+5:30
'सिंघम अगेन'बरोबरच अर्जुन मलायका अरोरासोबत झालेल्या ब्रेकअपमुळेही चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने गेली पाच वर्ष त्याच्यासाठी फार कठीण गेल्याचं म्हटलं आहे.

"प्रेमासाठी मी खूप वेळ वाट पाहिली, पण...", अर्जुन कपूरने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "गेली ५ वर्ष..."
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा सिंघम अगेन सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. या सिनेमात अर्जुनने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'सिंघम अगेन'बरोबरच अर्जुन मलायका अरोरासोबत झालेल्या ब्रेकअपमुळेही चर्चेत आहे. इतकी वर्ष डेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन वेगळे झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने गेली पाच वर्ष त्याच्यासाठी फार कठीण गेल्याचं म्हटलं आहे.
अर्जुनने नुकतीच मसाला डॉट कॉमला मुलाखत दिली. या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, "मी प्रेम आणि कौतुकासाठी खूप वेळ वाट पाहिली. मला वाटतं की माझ्या पदार्पणाला खूप प्रेम मिळालं. ती भावना मला परत अनुभवायची आहे. जेव्हा लोक तुम्हाला तुम्ही साकारलेल्या भूमिकेचं नाव घेऊन हाक मारतात. ते मला पुन्हा अनुभवायचं आहे. म्हणूनच सध्या मी ही फेज एन्जॉय करत आहे. यातून मला खूप सकारात्मकता, एनर्जी, प्रेम मिळत आहे. यापुढेही खूप मेहनत करायची आहे".
"चाहते मला प्रोत्साहन देतात आणि मला सपोर्ट करतात. माझ्यासाठी हे त्यांचं प्रेम आहे. जगात चांगले लोकही आहेत. जे तुम्हाला सपोर्ट करतात. गेली ५ वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती", असंही अर्जुन पुढे म्हणाला. गेल्या काही वर्षांत अर्जुनचे सिनेमे फ्लॉप गेले आहेत. पण, सिंघम अगेनमधून त्याने जोरदार कमबॅक केलं आहे. त्याबरोबरच मलायकाबरोबर ब्रेकअप झाल्याने तो पर्सनल आयुष्यातही कठीण काळातून जात आहे.