'सिंघम ३'चा व्हिलन ठरला! रोहित शेट्टीच्या चित्रपटात सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 16:31 IST2023-09-15T16:31:07+5:302023-09-15T16:31:47+5:30
'सिंघम ३'मधील खलनायकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

'सिंघम ३'चा व्हिलन ठरला! रोहित शेट्टीच्या चित्रपटात सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री
बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणजे 'सिंघम'. रोहित शेट्टीच्या या अॅक्शन चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं. या चित्रपटाच्या सीक्वलला म्हणजेच 'सिंघम रिटर्न्स'ला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता 'सिंघम ३'च्या प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. अजय देवगण पोलिसाच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटात खलनायक कोण असणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. 'सिंघम ३'मधील खलनायकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
रोहित शेट्टीच्या 'सिंघम ३' मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर 'सिंघम ३'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुनने या भूमिकेसाठी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. २०११मध्ये 'सिंघम' प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१४ साली 'सिंघम २' प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता १० वर्षांनी 'सिंघम ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२४मध्ये रोहित शेट्टीचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'जवान'साठी घेतलेल्या मानधनाबाबत दीपिका पदुकोणचा मोठा खुलासा, म्हणाली, "मी या चित्रपटासाठी..."
अर्जुन कपूरने 'इशकजादे' चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो 'हाफ गर्लफ्रेंड', 'कुत्ते', 'कि अँड का', '२ स्टेट्स', 'गुंडे' या चित्रपटांत झळकला. अर्जुनने 'पानीपत' चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारली होती.