​गायक उस्ताद बडे फतेह अली खान यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 14:37 IST2017-01-06T14:37:15+5:302017-01-06T14:37:15+5:30

पाकिस्तानचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद बडे फतेह अली खान यांचे गुरुवारी (५ जानेवारी) निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. ...

Singer Ustad Bade Fateh Ali Khan died | ​गायक उस्ताद बडे फतेह अली खान यांचे निधन

​गायक उस्ताद बडे फतेह अली खान यांचे निधन

किस्तानचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद बडे फतेह अली खान यांचे गुरुवारी (५ जानेवारी) निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजाराने आजारी होते. गत दहा दिवसांपासून इस्लामाबादेतील एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

ख्याल, ठुमरी आणि कव्वाली अशा विविध गायन प्रकारात मुशागिरी करणारे  उस्ताद बडे फतेह अली खान यांचे केवळ पाकिस्तानाच नाहीत तर भारत, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका व पश्चिम आशिया असे सर्वत्र चाहते होते.
पटियाला घराण्याचे उस्ताद बडे फतेह अली खान हे गायक अली खान व हामीद अली खान यांचे लहान बंधू होत. अमानत अली व उस्ताद बडे फतेह अली खान यांची जुगलबंदी प्रचंड गाजली. या दोघांच्या जुगलबंदीने अनेक संगीतश्रोत्यांना वेड लावले. उस्ताद बडे फतेह अली खान हे आपल्या कुटुंबातील सहाव्या पिढीचे शास्त्रीय गायक होते.
सन १९३५ मध्ये पंजाबच्या पटियाला(भारत) येथे त्यांचा जन्म झाला. तरूण वयातच संगीत क्षेत्रात त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निमार्ण केली. १९६९ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपतींनी ‘प्राईड आॅफ परफार्मन्स मेडल’ने गौरविण्यात आले होते. चारशेपेक्षा अधिक राग आणि गाण्यांना आवाज देणारे  उस्ताद बडे फतेह अली खान  यांचे‘मोरा पिया मो से बोले ना’ हे सर्वाधिक लोकप्रीय गीत आहे.

सुविख्यात शास्त्रीय व रॉक गायक शफकत अमानत अली यांचे ते काका. त्यांच्या निधनावर शफकत अली यांनी तीव्र शोक व्यक्त केला. टिष्ट्वटरवर त्यांचा एक फोटो पोस्ट करत,‘उस्ताद बडे फतेह अली खान यांच्या निधनाने पटियाला घराण्यातील आम्हा सगळ्यांसाठी एक युगाचा अंत झाला’ असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे.

Web Title: Singer Ustad Bade Fateh Ali Khan died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.