का मोडला होता सुनिधीचा पहिला संसार?, खुलासा करत गायिका म्हणाली, "माझ्याकडून चुका झाल्या पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 12:55 IST2023-09-18T12:50:20+5:302023-09-18T12:55:33+5:30

सुनिधीने 2002 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी अभिनेता बॉबी खानशी लग्न केले. मात्र, वर्षभरातच त्यांचं लग्न तुटले.

Singer sunidhi chauhan reminisces her broken marriage at the age of 18 | का मोडला होता सुनिधीचा पहिला संसार?, खुलासा करत गायिका म्हणाली, "माझ्याकडून चुका झाल्या पण...'

का मोडला होता सुनिधीचा पहिला संसार?, खुलासा करत गायिका म्हणाली, "माझ्याकडून चुका झाल्या पण...'

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने आज केवळ संगीत विश्वातच नव्हे तर संपूर्ण इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्युझिक इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुनिधीने केवळ हिंदीच नाही तर मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, पंजाबी, आसामी, नेपाळी आणि उर्दू भाषांमध्येही अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. अलीकडेच, सुनिधीने वयाच्या 18 व्या वर्षी तिच्या मोडलेल्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे.


सुनिधीने 2002 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी अभिनेता बॉबी खानशी लग्न केले. मात्र, वर्षभरातच त्यांचं लग्न तुटले. नुकतेच सुनिधीने एका मुलाखतीत तिच्या मागील लग्नाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत, सुनिधी चौहानने तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांबाबत खुलासा केला. सुनिधी म्हणाली, "माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण त्या चुकांसाठी मी कृतज्ञ आहे, कारण त्यातून मी बरचं काही शिकले. जर त्या चुका झाल्या नसत्या तर माझं आयुष्य खूप कंटाळवाणं झालं असते. मी आयुष्यातल्या बऱ्याच चांगल्या गोष्टींपासून वंचित राहिले असते. 


तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना सुनिधी म्हणाली की, तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंग आणि अडचणींबद्दल तिला कधी कधी कृतज्ञता वाटते, कारण या अनुभवांमधून तिला जीवनाच्या चांगल्या बाजूची जाणीव झाली. सध्या सुनिधी पती हितेश सोनिक आणि त्यांचा मुलगा तेगसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. 

Web Title: Singer sunidhi chauhan reminisces her broken marriage at the age of 18