सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

By अमित इंगोले | Updated: September 28, 2020 16:58 IST2020-09-28T16:54:08+5:302020-09-28T16:58:37+5:30

प्रसिद्ध गायिका सोना महापात्राने ट्विट केलंय. ज्यात तिने कंगनाबाबत म्हणाली की, कंगना स्वत:ला सोडून कुणासाठीही उभी राहिलेली नाही.

Singer Sona Mohapatra slams Kangana Ranaut says she has not ever stood up for anyone | सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मुंबईची तुलना पीओकेशी केल्यावर कंगना रणौतने बॉलिवूडवरही जोरदार हल्ला केला होता. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. अशात प्रसिद्ध गायिका सोना महापात्राने ट्विट केलंय. ज्यात तिने कंगनाबाबत म्हणाली की, कंगना स्वत:ला सोडून कुणासाठीही उभी राहिलेली नाही. तसेच सोना महापात्राने लिहिले की, हो बॉलिवूडमधील काही वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवण्याबाबत तिला नक्कीच बहादूर म्हटलं जाऊ शकतं.

सोना महापात्राने ट्विट करत लिहिले की 'कंगना कधीही स्वत:ला सोडून कुणासाठीही उभी राहिलेली नाही आणि ना कधी त्या लोकांची आठवण ठेवली. ज्यांनी तिचं कौतुक केलंय. ती काही फार बदल करून आणणारी आणि कोणत्याही विचाराच्या नेत्याच्या लायकीची नाही. हो, इंडस्ट्रीतील काही वाईट गोष्टींबाबत आवाज उठवण्यासाठी ती बहादूर आहे. बस इतकंच'. तिने ट्विटमध्ये पुढे लिहिले की, 'जेव्हा अनुष्का शर्मा आणि इतरांबाबत कंगनाने पोस्ट शेअर केली होती. मला इतकंच सांगायचंय की, कंगना रणौतने कृपया काही नारीवादी मैत्रीणी बनवाव्या आणि चांगला सल्लागार ठेवावा'.

सोना महापात्राने कंगना रणौतची कानउघाडणी करत लिहिले की, 'तिने नेहमी महिला कार्ड खेळणं बंद करावं. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने गायिका सोना महापात्राला ट्विटरवर ब्लॉक केलंय. याची माहिती सोना महापात्राने ट्विट करून दिली. तिने लिहिले की, 'मी कधी तिला फॉलो केलं नाही. पण याबाबत आजच माहिती पडलं. कंगनाला प्रत्येकावर टीका करायची आहे. तिने हे शिकलं पाहिजे की, गोष्टी कशा निपटवायच्या'.

हे पण वाचा :

'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश

मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं

बाबो! कंगना रणौत आणि महेश भट्टच्या 'त्या' व्हायरल फोटोने खळबळ, राखी सावंत म्हणाली.....

Web Title: Singer Sona Mohapatra slams Kangana Ranaut says she has not ever stood up for anyone