एसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य
By गीतांजली | Updated: September 25, 2020 19:36 IST2020-09-25T19:21:27+5:302020-09-25T19:36:44+5:30
सपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनामुळे भारतीय संगीत जगताचे प्रचंड नुकसान झाले आहे.

एसपी बालासुब्रमण्यम यांना आयुष्यभर वाटत होती या गोष्टीची खंंत, मुलांबाबत केले होते वक्तव्य
एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनामुळे भारतीय संगीत जगताचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या आवाजाच्या जादुचे सलमानपासून ते रहमानपर्यंत सगळचे चाहते होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना व्हायरस विरोधात हॉस्पिटलमध्ये लढत होते. इतक्या महान गायकाला आयुष्यभर मात्र एका गोष्टीची सल कायम राहिली.
बालासुब्रमण्यम एकदा म्हणाले, मी माझ्या मुलांना मोठं होताना पाहिले नाही आणि आयुष्यभर मला या गोष्टीची खंत राहिली. आपल्या आयुष्याची 50 वर्षे मी संगीताला समर्पित केली. रोज 11-11 तास मी काम करायचो. मला माझ्या मुलांची आठवण येते. एसपी बालासुब्रमण्यम आपल्या मागे पत्नी सावत्री आणि मुलगी पल्लवी आणि मुलगा एसपी चरण यांना एटके सोडून गेले आहेत.
‘सलमानचा आवाज’
1989 साली आलेल्या मैनें प्यार किया या सलमानच्या चित्रपटातील सर्व गाणी बालसुब्रमण्यम यांनी गायली होती. ही सर्व गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. सलमानच्या करिअरच्या सुरुवातीला सलमानसाठी त्यांनी अनेक गाणी गायली. अनेक वर्षे ‘सलमानचा आवाज’ म्हणूनच ते ओळखले जात होते.
लागोपाठ 12 तासांत 21 गाणी
एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी एक अप्रतिम विक्रम रचला होता. त्यांनी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कन्नडमध्ये 21 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी एका दिवसात तामिळमध्ये 19 आणि हिंदीमध्ये 16 गाणी रेकॉर्ड केली होती. सुरुवातीच्या काळात एका दिवशी ते 15-16 गाणी रेकॉर्ड करणे ही त्यांची दिनचर्या झाली होती. पण गाण्याबद्दल ते तितकेच गंभीरही होते. त्यांना एखादे गाणे कठीण वाटायचे त्यावेळी ते तयार करण्यासाठी 8-10 दिवसांचा कालावधी घेत़ निर्मात्यांनी घाई केली तर ते गाण्यासाठी थेट नकार देत असत.
ते शब्द जिव्हारी लागले अन् बालसुब्रमण्यम झाडाखाली बसून ढसाढसा रडले...!!