४३ वर्षीय गायिकेने घेतलाय मूल जन्माला न घालण्याचा निर्णय, नवऱ्याचाही पाठिंबा; काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:56 IST2025-12-31T15:55:43+5:302025-12-31T15:56:12+5:30
आम्ही सर्व मोह माया स्वत:सोबतच..., गायिका काय म्हणाली?

४३ वर्षीय गायिकेने घेतलाय मूल जन्माला न घालण्याचा निर्णय, नवऱ्याचाही पाठिंबा; काय आहे कारण?
बॉलिवूड गायिका नेहा भसीन चर्चेत आहे. यावेळी ती तिच्या अल्बम साँगमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने मुलांना जन्म न देण्यावर भाष्य केलं आहे. तिने आणि पतीने मिळून हा मुद्दामून घेतलेला निर्णय असल्याचं ती म्हणाली. मात्र त्यांनी असा निर्णय घेतला?
नुकतंच एका मुलाखतीत नेहा भसीन म्हणाली, "आम्ही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व मोह माया स्वत:सोबतच संपवू. आम्हाला वाटतं माणसाने आयुष्य स्वत:च्या अटींवर जगावं. कोणावरही समाजाचा दबाव असू नये. यामागे काही ठराविक कारण नाही. फक्त आम्हाला असं वाटतं की बायोलॉजिकल लिगसी असली पाहिजे असं गरजेचं तर नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि यावर आम्ही ठाम आहोत."
समीर आणि नेहाची केमिस्ट्री कमाल आहे. दोघंही क्रिएटिव्ह फिल्डमध्ये आहोत. ती म्हणाली, "आमच्यासारख्या क्रिएटर्सनी लग्नच करु नये. आमचं पहिलं प्रेम हे क्रिएशन आहे. पार्टनर नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर येतो. (हसतच)संसारात कधीही मिसअंडरस्टुड वाटलं नाही पाहिजे."
नेहाच्या या स्टेटमेंटवरुन एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे.अनेकांनी नेहाच्या मताला सहमती दर्शवली आहे तर काहींनी तिला विरोध केला आहे. नेहाने 'स्वॅग से स्वागत','जुती मेरी','कुछ खास' ही काही गाणी गायली आहेत.