गायक आणि संगीतकार अंकित तिवारी पल्लवी शुक्लासोबत अडकला लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 11:31 IST2018-02-24T06:01:37+5:302018-02-24T11:31:37+5:30

'आशिकी 2' सिंगर आणि संगीतकार अंकित तिवारीने पल्लवी शुक्लासोबत सात फेरे घेतले आहेत. अंकित तिवारीने आपल्या होमटाऊन कानपूरमध्ये लग्न केले आहे

Singer and composer Ankit Tiwari Pallavi Shukla gets stuck with her marriage | गायक आणि संगीतकार अंकित तिवारी पल्लवी शुक्लासोबत अडकला लग्नाच्या बेडीत

गायक आणि संगीतकार अंकित तिवारी पल्लवी शुक्लासोबत अडकला लग्नाच्या बेडीत

'
;आशिकी 2' सिंगर आणि संगीतकार अंकित तिवारीने पल्लवी शुक्लासोबत सात फेरे घेतले आहेत. अंकित तिवारीने आपल्या होमटाऊन कानपूरमध्ये लग्न केले आहे. अंकितने पल्लवीशी दोन दिवस आधी साखरपुडा केला होता या गोष्टीची माहिती अंकितनेच सोशल मीडियावर दिली होती.  

अंकितने साखरपुड्याचा फोटो शेअर करत लिहिले होते की,''मी संपूर्ण आयुष्य तुझावर प्रेम करेन, तुझी काळजी घेऊन आणि तुझा आदर करेन.'' यानंतर अंकितवर त्याच्या फॅन्सने शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता लग्नाचा पहिला फोटो शेअर करताना देखील अंकितने कॅप्शन देखील लिहिले आहे. या फोटोत अंकितने गोल्डन रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर पल्लवीने नारंगी आणि लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. 

अंकितच्या आजीला पल्लवी झांसी रेल्वे स्टेशनवर एक सुंदर मुलगी भेटली होती. अंकितच्या आजीला पल्लवी ऐवढी आवडली की तिने घरी अंकित आणि पल्लवीच्या लग्नाची बोलणी केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांकडून या लग्नासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. पल्लवी गेल्या अनेक वर्षांपासून बंगळुरुमध्ये काम करते आहे. मात्र आता लग्नानंतर ती अंकितसोबत मुंबईत शीफ्ट होणार आहे.  

'सून रहा है ना तू' या गाण्याने अंकितने  प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवले आहे. अंकितची सुरेख गायिका होती. पण त्या फक्त भजन, जागणरण अशा प्रकारचे गाणे गात असे. अंकितला बॉलिवूडची ओढ लागली होती. त्यामुळे त्याचे ध्येय मुंबईत होते.  त्यासाठी त्यांने खूप स्ट्रगल केल्याचे त्यांनेएक इंटरव्ह्रु दरम्यान सांगितले होते. पुढे तो म्हणाला होता की, ''आयुष्यात चांगुलपणा हा नेहमी अंगी बाळगला गेला पाहिजे. ती एक जिद्द असली पाहिजे. कारण चांगुलपणाच माणसाला जीवनात यशस्वी करतो. हा कोणता फिल्मी डायलॉग नसून मी स्वत: हे अनुभवलं आहे

Web Title: Singer and composer Ankit Tiwari Pallavi Shukla gets stuck with her marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.