एकापेक्षा एक सरस गाणी गायली! यशाच्या शिखरावर असताना अलिशा चिनॉय यांनी का सोडलं बॉलिवूड? म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:27 IST2025-11-28T12:22:49+5:302025-11-28T12:27:35+5:30
'मेड इन इंडिया' फेम गायिका अलिशा चिनॉय यांनी सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण, शेअर केले 'ते' अनुभव

एकापेक्षा एक सरस गाणी गायली! यशाच्या शिखरावर असताना अलिशा चिनॉय यांनी का सोडलं बॉलिवूड? म्हणाल्या...
Alisha Chinai: हिंदी सिनेसृष्टीत रॉक आणि पॉप म्युझिकला लोकप्रियता मिळवून देणारं नाव म्हणजे अलिशा चिनॉय. 'मेड इन इंडिया', 'कजरा रे' तसेच 'दिल तू ही बता' यांसारखी सुपरहिट गाणी देणारी ही गायिका मागील काही काळापासून इंडस्ट्रीपासून दुरावली आहे. शेवटचं त्या २०२३ मध्ये आलेल्या हृतिक रोशनच्या क्रिश-३ चित्रपटासाठी गायल्या होत्या. ते गाणं चांगलंच गाजलं होतं. मात्र, त्यानंतर आलिशा यांचं कोणतंही गाणं आलं नाही. त्यात आता एका मुलाखतीत या गायकाने याचं कारण सांगितलं आहे.
अलिकडेच आलिशा चिनॉय यांनी द फ्री प्रेस जर्नलला आलिशा चिनॉय यांनी मुलाखत दिली.या मुलाखतीदरम्यान,अलिशा यांना विचारण्यात आलं की, त्यांनी स्वत: ला इतकी वर्षे पार्श्वगायनापासून दूर का ठेवलं? त्या निर्णयाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "खरं सांगायचं तर, मला पार्श्वगायनापेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. शिवाय एक कलाकार म्हणून मला विश्रांतीचीही थोडी गरज होती. "
इंडस्ट्रीतील पॉलिटिक्सबद्दल गायिका काय म्हणाली...
दरम्यान, या मुलाखतीत अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. ज्यामुळे त्यांनी तडजोड करण्याऐवजी बाजूला होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्या म्हणाल्या, "याची इतरही कारणे होती, जसं की इंडस्ट्रीतील पॉलिटिक्स. एका कलाकारासाठी कॉपीराईटसारख्या समस्या शिवाय एक सारखी वागणून न मिळणं हेही मुद्दे होतेच. तसेच आमच्याकडून काही कॉन्ट्रॅक्सवर सह्या घेतल्या जात होत्या. जे पूर्णपणे चुकीचं होतं. त्या मी कोणतेही कॉन्ट्रक्ट्स साईन करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे लोकांनी मला फोन करणं बंद केलं. "
शिवाय आलिशा यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचं कारण फक्त त्यांचं प्रोफेशनल आयुष्य नव्हतं. तर काही वैयक्तिक गोष्टी सुद्धा त्याला कारणीभुत होत्या. "हा निर्णय माझ्यासाठी ठीक होता. कारण,माझी काही वैयक्तिक कारणंही होती."