Video: प्रसिद्ध गायकाने तारा सुतारियाला सर्वांसमोर किस केलं, बॉयफ्रेंड वीर पहाडियाचा जळफळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:05 IST2025-12-27T12:04:56+5:302025-12-27T12:05:45+5:30
गायकाने तारा सुतारियाला किस करताच तिचा बॉयफ्रेंड वीर पहाडिया अस्वस्थ झालेला दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Video: प्रसिद्ध गायकाने तारा सुतारियाला सर्वांसमोर किस केलं, बॉयफ्रेंड वीर पहाडियाचा जळफळाट
लोकप्रिय पंजाबी गायक एपी ढिल्लों सध्या त्याच्या 'ओल्ड मनी' टूरमुळे चर्चेत आहे. मुंबईत पार पडलेल्या त्याच्या अलीकडील कॉन्सर्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्टेजवर या दोघांमध्ये अनोखी केमिस्ट्री बघायला मिळाली. पण त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये उभा असलेला ताराचा कथित बॉयफ्रेंड वीर पहाडिया याची प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कॉन्सर्ट दरम्यान, एपी ढिल्लों आपल्या गाण्यावर परफॉर्म करत असताना त्याने तारा सुतारियाला स्टेजवर आमंत्रित केले. काळ्या रंगाच्या ग्लॅमरस आऊटफिटमध्ये असलेल्या ताराने स्टेजवर येताच एपीला मिठी मारली. यावेळी एपीने ताराच्या गालावर किस केल्याने प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. या दोघांनी त्यांच्या 'थोडिसी दारू' या गाण्यावर एकत्र डान्स केला, ज्यामध्ये त्यांची बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येत होती.
मात्र, खरी चर्चा रंगली ती प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या वीर पहाडियाची. तारा जेव्हा स्टेजवर एपी ढिल्लोसोबत परफॉर्म करत होती, तेव्हा वीर खाली उभा राहून हे सर्व पाहत होता. जेव्हा एपीने ताराला मिठी मारली आणि किस केलं तेव्हा मात्र वीरच्या चेहऱ्यावर नाराजी, अस्वस्थता, जळफळाट स्पष्टपणे दिसत होता.
काहींना मात्र वीर शांतपणे हे पाहत असून त्याने हे खिलाडूवृत्तीने घेतलं, असंही मत नोंदवलं आहे. तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांचे नाते सोशल मीडियावर जाहीर केले होते. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचंही बोललं जातंय.