'सिंग इज ब्लिंग' मैलाचा दगड - एमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 03:09 IST2016-01-16T01:19:33+5:302016-02-12T03:09:45+5:30
अ भिनेत्री एमी ज्ॉक्सन सध्या तिच्या 'सिंग इज ब्लिंग' चित्रपटाच्या यशामुळे खूपच खुश आहे. तिच्या मते, हा चित्रपट म्हणजे ...

'सिंग इज ब्लिंग' मैलाचा दगड - एमी
अ भिनेत्री एमी ज्ॉक्सन सध्या तिच्या 'सिंग इज ब्लिंग' चित्रपटाच्या यशामुळे खूपच खुश आहे. तिच्या मते, हा चित्रपट म्हणजे करियरमधील 'माईल स्टोन' आहे. 'सिंग इज ब्लिंग' ला रसिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पहायला एमीने चक्क मुंबईतील एका चित्रपटगृहाला भेट दिली. यावेळी बोलताना ती म्हणाली, 'प्रेक्षकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेले आहे. प्रत्येकजण हा चित्रपट एन्जॉय करत आहे. खरंच हा चित्रपट माझ्या करियरसाठी मैलाचा दगड ठरला आहे.' प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षयकुमार, के.के. मेनन आणि लारा दत्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. २0१0 मध्ये तामिळी चित्रपट 'मद्रासापट्टीनम'द्वारे एमीने करियरला सुरूवात केली. २0१२ मध्ये 'एक दिवाना था'या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलेल्या एमीला जवळपास सगळ्याच हिरोंसोबत काम करण्याची इच्छा आहे. अक्षयकुमार सोबत काम करायला मिळाल्यामुळे ती स्वत:ला नशीबवान समजते.