Simmba Trailer: आला रे, रणवीर सिंगचा सिम्बा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 15:54 IST2018-12-03T15:34:03+5:302018-12-03T15:54:54+5:30
दिग्दर्शक रोहित शेट्टीने जेव्हापासून तो रणवीर सिंगला घेऊन सिम्बा बनवण्याची घोषणा केली आहे त्या दिवसापासून फॅन्सना त्यांच्या सिनेमाची रिलीजची वाट बघत आहेत

Simmba Trailer: आला रे, रणवीर सिंगचा सिम्बा
दिग्दर्शक रोहित शेट्टीने जेव्हापासून तो रणवीर सिंगला घेऊन सिम्बा बनवण्याची घोषणा केली आहे त्या दिवसापासून फॅन्सना त्यांच्या सिनेमाची रिलीजची वाट बघत आहेत. रणवीर सिंग यात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आज या सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अजय देवगणच्या सिंघममधील सीन होते. ट्रेलरमध्ये रणवीर सिंग अॅक्शन हिरोच्या अंदाजात दिसतोय. ट्रेलर बघताना या सिनेमात भरपूर अॅक्शन आणि कॉमेडी असणार याचा अंदाज येतो.
'सिम्बा' सिनेमात रणवीर सिंग सोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे.' सिम्बा' हा चित्रपट साऊथच्या 'टेम्पर' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र 'सिम्बा'मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.सिम्बा या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.