थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'सिकंदर', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 11:52 IST2025-04-06T11:51:13+5:302025-04-06T11:52:35+5:30

थिएटर्सनंतर ओटीटीवर येणार सलमान खान 'सिकंदर', कधी, कुठे आणि कसा? घ्या जाणून?

Sikandar Ott Release: Salman Khan And Rashmika Mandanna's Action Romance Film Will Stream On This Platform | थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'सिकंदर', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'सिकंदर', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

Sikandar Ott Release: ईद (Eid) आणि सलमान खानचे  (Salman Khan) चित्रपट हे अनेक वर्षांपासून एक समीकरण आहे. दरवर्षी ईदला भाईजानची सुपर ब्लॉकबस्टर सिनेमाची ईदी चाहत्यांसाठी ठरलेली. यंदाही ईदला सलमानचा 'सिकंदर' (Sikandar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानने 'सिकंदर'  सिनेमातून बॉक्स ऑफिसवर दीड वर्षांनी पुनरागमन केलं. सल्लू भाईचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला की, बंपर ओपनिंग ठरलेलंच. पण, 'सिकंदर'च्या बाबतीत मात्र, तसं झाल्याचं पाहायला मिळत नाही. अशातच आता सलमान खानच्या 'सिकंदर'संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या एक दिवस आधी म्हणजे ३० मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे. 'सिकंदर' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स हे ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅक्शन रोमान्स चित्रपटाचा अधिकृत स्ट्रीमिंग पार्टनर आहे. नेटफ्लिक्सवर सलमान खानचा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला एका महिन्यापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागू शकते. थिएटरनंतर सात ते आठ आठवड्यांनी चित्रपट ओटीटीवर येतो. त्यामुळे ११ मे ते २५ मे दरम्यान सिकंदर ओटीटीवर येण्याचा अंदाज आहे. 'सिकंदर'ची ओटीटी रिलीज तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, यंदा सलमानची बॉक्स ऑफिसवरची जादू फिकी पडल्याचं पाहायला मिळत आहे. 'सिकंदर'ला अद्याप १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेता आलेली नाही. याशिवाय सिनेमाचं मूळ बजेट अर्धही वसूल झालेलं नाही. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार सलमानच्या सिनेमाने सात दिवसांमध्ये ९७.५० कोटींचा गल्ला जमावला आहे. 'सिकंदर'च्या कमाईत दिवसेंदिवस घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे भाईजानच्या सर्वच चाहत्यांना धक्का बसला आहे.
 

Web Title: Sikandar Ott Release: Salman Khan And Rashmika Mandanna's Action Romance Film Will Stream On This Platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.