"होली रे होली, बस्ती मैं होली"; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:08 IST2025-03-11T18:06:29+5:302025-03-11T18:08:13+5:30

सलमान खानच्या आगामी सिकंदर सिनेमातील दुसरं गाणं भेटीला आलं आहे. होळीनिमित्त हे गाणं सुपरहिट होणार यात शंका नाही (salman khan, sikandar)

sikandar movie song bam bam bhole out salman khan rashmika mandanna | "होली रे होली, बस्ती मैं होली"; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ)

"होली रे होली, बस्ती मैं होली"; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ)

'सिकंदर' (sikandar) सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात सलमान खानने (salman khan) प्रमुख भूमिका साकारली आहे. 'सिकंदर' सिनेमातील 'जोहरा जबी' हे पहिलं गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. आता या सिनेमातील दुसरंं गाणं रिलीज झालंय. 'बम बम भोले' (bam bam bhole) असं या गाण्याचं नाव आहे. आगामी होळी सणानिमित्त हे गाणं सर्वांच्या प्लेलिस्टमध्ये असेल यात शंका नाही. या गाण्यातील सलमान खानने केलेल्या हूक स्टेपनेही सर्वांचं लक्ष वेधलंय.

'बम बम भोले' गाण्याची चर्चा

'सिकंदर' सिनेमातील 'बम बम भोले' गाणं नुकतंच रिलीज झालंय. या गाण्यात सुरुवातीला रॅप साँग पाहायला मिळतो. पुढे लाल रंगाची उधळण होते अन् सलमान खानची एन्ट्री होते. याच गाण्यात काजल अग्रवालही दिसते. काजलला आपण सर्वांनी सिंघम सिनेमात पाहिलं होतं. अनेक वर्षांनी काजलचं बॉलिवूडमध्ये होणारं दर्शन सुखावह आहे. पुढे सलमान खान रश्मिकासोबत डान्स करताना दिसतो. या गाण्यात सलमानने केलेल्या हूक स्टेपची चांगलीच चर्चा रंगली आहे.



सिकंदर सिनेमा रिमेक आहे?

'सिकंदर' सिनेमाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगोदास यांनी 'सिकंदर' रिमेक आहे की ओरिजीनल याविषयी मौन सोडलंय. ए.आर.मुरुगोदास म्हणाले की, "हा सिनेमा संपूर्णतः एका ओरिजिनल कथेवर बनवला गेला आहे. या सिनेमातील प्रत्येक सीन ऑथेंटिक पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन आणि फ्रेश अनुभव मिळेल. हा सिनेमा रिमेक नाहीये. सिनेमाचं संगीत, अॅक्शन, इमोशनल सीन्स या प्रत्येक गोष्टी प्रेक्षकांना आवडतील याची आम्हाला खात्री आहे." त्यामुळे 'सिकंदर' रिेमेक नाही,  हे स्पष्ट झालंय.

Web Title: sikandar movie song bam bam bhole out salman khan rashmika mandanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.