"सिनेमा साइन कर नाहीतर.." जेव्हा किंग खानने दिला नकार, अंडरवर्ल्डने दिली जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:11 IST2025-01-15T17:11:03+5:302025-01-15T17:11:42+5:30

Shah Rukh Khan:बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा सामना करावा लागला होता. शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या संघर्षाबद्दल बोलताना दिसत आहे.

''Sign the movie or else..'' When King Khan refused, the underworld threatened to kill him | "सिनेमा साइन कर नाहीतर.." जेव्हा किंग खानने दिला नकार, अंडरवर्ल्डने दिली जीवे मारण्याची धमकी

"सिनेमा साइन कर नाहीतर.." जेव्हा किंग खानने दिला नकार, अंडरवर्ल्डने दिली जीवे मारण्याची धमकी

अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड कनेक्शन हा कायमच चर्चेचा विषय असतो. आजही काही कलाकारांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शन्सचे किस्से ऐकायला मिळतात. तर काहींना थेट अंडरवर्ल्डच्या धमक्या आल्याचेही ऐकायला मिळते. दरम्यान आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुख(Shah Rukh Khan)लाही अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा सामना करावा लागला होता. शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या संघर्षाबद्दल बोलताना दिसत आहे.

शाहरुख खान म्हणाला होता, 'हिंदी फिल्म इंडस्ट्री ही सर्वात साधी इंडस्ट्री आहे. आम्ही जगातील सर्वात मोठे चित्रपट निर्माते आहोत.'  शाहरुखने सांगितले की, त्याला चित्रपट करण्यास सांगितले होते. निर्माता कोण आहे असे विचारल्यावर 'हाच माणूस आम्ही पाठवत आहोत' असे उत्तर मिळाले. तू त्याच्याशी बोल आणि चित्रपट साइन कर.

शाहरुखला तीन वर्ष होतं पोलीस संरक्षण

शाहरुख खान म्हणाला, 'तुला जर जीवाची भीती वाटत असेल तर तू साइन कर किंवा तू तुझे नशीब आजमावायला तयार आहेस, तर तू चित्रपट करण्यास नकार दिला.' शाहरुखने चित्रपट करण्यास नकार दिला होता. किंग खानने नकार दिल्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचेही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. त्याला कधी धमकावले आहे का, असे विचारले असता तो म्हणाला, 'हो, असे अनेक प्रसंगी झाले आहे. मला तीन वर्षे कडक पोलीस संरक्षण होते.

Web Title: ''Sign the movie or else..'' When King Khan refused, the underworld threatened to kill him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.