मानलं भावा..! दुखापतीनंतर सिद्धार्थ मल्होत्रानं सुरु ठेवलं सिनेमाचं शूटिंग, मिशन मजनूच्या सेटवर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 17:38 IST2021-04-06T17:33:10+5:302021-04-06T17:38:11+5:30
Sidharth Malhotra gets injured on Mission Majnu set :सिद्धार्थ सध्या 'मिशन मजनू' चित्रपटाचे शूटिंग करतो आहे.

मानलं भावा..! दुखापतीनंतर सिद्धार्थ मल्होत्रानं सुरु ठेवलं सिनेमाचं शूटिंग, मिशन मजनूच्या सेटवर झाला अपघात
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झाली आहे ही बातमी एकून त्याचे चाहते चिंतेत आहेत. एका अॅक्शन सिक्वेन्सच्या शूटिंगच्या वेळी त्याला चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाल्याची बातमी आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार चित्रपटाच्या सेटमध्ये घडलेल्या घटनेत सिद्धार्थच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे कळतेय.
सिद्धार्थ सध्या 'मिशन मजनू' चित्रपटाचे शूटिंग करतो आहे, यात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. हा चित्रपट भूतकाळातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट अॅक्शन सीन्सने भरलेला आहे आहे.
रिपोर्टनुसार, सिद्धार्थ उडी मारताना एक अॅक्शन सीन करत होता आणि त्यावेळी एका मेटलचा तुकडा त्याच्या गुडघ्याला लागला. शूटिंग थांबवण्याऐवजी विश्रांती घेण्याऐवजी, सिद्धार्थने दुखापतीसाठी औषध घेतले. जिथे त्याला दुखापत झाली तेथे त्याने बर्फ लावला आणि मग त्याने उर्वरित अॅक्शन सीन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे.