Wedding Bells! सिड-कियारा यांच्या लग्नासाठी आलिशान पॅलेस सज्ज; जैसलमेरमध्ये होणार थाटात लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:44 IST2023-02-02T15:39:25+5:302023-02-02T15:44:22+5:30

सिड कियाराच्या लग्नात पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे ७० कारची व्यवस्था करण्यात आली आहे.

Sidharth malhotra kiara advani wedding guest list news | Wedding Bells! सिड-कियारा यांच्या लग्नासाठी आलिशान पॅलेस सज्ज; जैसलमेरमध्ये होणार थाटात लग्न

Wedding Bells! सिड-कियारा यांच्या लग्नासाठी आलिशान पॅलेस सज्ज; जैसलमेरमध्ये होणार थाटात लग्न

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आता या ग्रँड लग्नाची पाहुण्यांची यादी समोर आली आहे.  या लग्नामध्ये फक्त 100-125 पाहुणे यात सहभागी होणार आहेत.


सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूडपासून इतर क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, करण जोहर, वरुण धवन आणि ईशा अंबानीपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत कारण कियारा आणि शाहिद खूप जवळचे मित्र आहेत. यासोबत कियारा-सिद्धार्थ त्यांच्या बालपणीच्या मित्रांनाही या लग्नात आमंत्रित करणार आहेत.

रिपोर्टनुसार जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी एक लक्झरी व्हिला बुक करण्यात आला आहे. यात सुमारे 80 खोल्या आहेत. इतकंच नाही तर या जोडप्याच्या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली असून, लग्नाआधीपासून ते लग्नापर्यंत सर्व फंक्शन पॅलेसमध्येच ठेवण्यात येणार आहेत. या पॅलेसचे दररोजचे भाडे 1 ते 2 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासोबतच पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे ७० कारची व्यवस्था करण्यात आली आहे.

 सिद्धार्थ आणि कियारा यांचे प्री-वेडिंग फंक्शन ४ आणि ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लग्नाच्या दिवशीच कपलचं हळदी आणि संगीत सेरेमनी होईल. जैसलमेरमध्ये लग्नानंतर हे जोडपे मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शनचे देणार  आहेत.
 

Web Title: Sidharth malhotra kiara advani wedding guest list news