Sidharth Malhotra सोबत Kiara Advani भारतातच घेणार सातफेरे, लग्नसंदर्भात मोठी अपडेट आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 15:44 IST2022-11-03T15:36:49+5:302022-11-03T15:44:23+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहेत.

Sidharth Malhotra सोबत Kiara Advani भारतातच घेणार सातफेरे, लग्नसंदर्भात मोठी अपडेट आले समोर
बी-टाउन लव्हबर्ड्स सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे त्यांच्या लग्नाबाबत काहीही बोलले नसले तरी या बातम्या मीडियात धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्या लग्नाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. दोघेही परदेशात नाही तर देशातच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या जवळच्या एका सूत्राने पिंकविलाला सांगितले की, हे कपल एका महिन्यापासून लग्नासाठी ठिकाण शोधत आहेत. कियारा-सिडने चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास स्पा अँड रिसॉर्ट्सशी संपर्क साधला होता. याच ठिकाणी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाह झाला होता.
रिपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थ गोव्यात लग्न करण्याचा विचार केला होता, परंतु सिद्धार्थचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे त्यांनी हा प्लान रद्द केला. कियारा अडवाणीच्या सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या चर्चेत होत्या.
शेरशाह या चित्रपटात सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका केली होती, तर कियाराने त्याची गर्लफ्रेंड डिंपल चीमाची भूमिका साकारली होती.