सिद्धार्थ मल्होत्रा - जान्हवी कपूरची धमाल केमिस्ट्री, 'परमसुंदरी'चा पहिला प्रोमो भेटीला, या दिवशी रिलीज होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:55 IST2025-05-29T13:54:39+5:302025-05-29T13:55:42+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी परमसुंदरी सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज झाला असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे

Sidharth Malhotra and Janhvi Kapoor paramsundari movie first promo video out | सिद्धार्थ मल्होत्रा - जान्हवी कपूरची धमाल केमिस्ट्री, 'परमसुंदरी'चा पहिला प्रोमो भेटीला, या दिवशी रिलीज होणार सिनेमा

सिद्धार्थ मल्होत्रा - जान्हवी कपूरची धमाल केमिस्ट्री, 'परमसुंदरी'चा पहिला प्रोमो भेटीला, या दिवशी रिलीज होणार सिनेमा

गेल्या काही दिवसांपासून सर्वांना एका सिनेमाची उत्सुकता आहे तो सिनेमा म्हणजे 'परमसुंदरी'.  काही महिन्यांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली होती. सर्वांना सिनेमाच्या टीझर, ट्रेलरची उत्सुकता होती. अखेर टीझर येण्याआधी 'परमसुंदरी' सिनेमाचा (paramsundari movie) पहिला प्रोमो भेटीला आला आहे. या प्रोमोत सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांची कधीही न पाहिलेली हटके केमिस्ट्री बघायला मिळतेय. मॅडॉक फिल्मसने या सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे.

'परमसुंदरी'चा पहिला प्रोमो

'परमसुंदरी' हा सिनेमा नॉर्थ-मीट्स-साऊथ शैलीतील सुंदर प्रेमकथा आहे. निसर्गरम्य अशा केरळमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. सिनेमाच्या पहिल्या प्रोमोत, सिद्धार्थ हा परमच्या भूमिकेत तर जान्हवी सुंदरीच्या भूमिकेत दिसते. सिद्धार्थ हा शहरातला असून जान्हवी केरळमध्ये राहणारी मुलगी दिसते. प्रोमोमध्ये खास साउथच्या धाटणीचं संगीत ऐकायला मिळत असून बॅकग्राऊंडला सोनू निगमचा आवाज ऐकायला मिळतो. 'परमसुंदरी' सिनेमाच्या पहिल्या प्रोमोला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली असून सिद्धार्थ - जान्हवीची हटके केमिस्ट्री लक्ष वेधून घेतेय.

कधी रिलीज होणार 'परमसुंदरी'

 प्रसिद्ध निर्माते दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली असून 'परमसुंदरी' सिनेमाचं दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केलं आहे. या सिनेमात पहिल्यांदाच जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र झळकणार असून, त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. 'छावा', 'भूलचूक माफ' या सिनेमांनंतर मॅडॉक फिल्मच्या आगामी 'परसुंदरी' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा २५ जुलै २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Sidharth Malhotra and Janhvi Kapoor paramsundari movie first promo video out