सिद्धार्थ खूश!! इंस्टाग्रामवर २० लाख फॉलोअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 16:56 IST2016-07-03T11:26:52+5:302016-07-03T16:56:52+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा सध्या जाम खूश आहे. सिद्धार्थच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या २० लाखांवर पोहोचलीय. होय, चाहत्यांचा हे प्रेम आणि प्रतिसाद पाहून सिड भारावून गेला आहे. मग काय, फॉलोअर्स आणि फॅन्सचे आभार तर मानायला हवे. यासाठी सिद्धार्थने काय केले माहितीयं??

सिद्धार्थ खूश!! इंस्टाग्रामवर २० लाख फॉलोअर्स
स द्धार्थ मल्होत्रा सध्या जाम खूश आहे. सिद्धार्थच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या २० लाखांवर पोहोचलीय. होय, चाहत्यांचा हे प्रेम आणि प्रतिसाद पाहून सिड भारावून गेला आहे. मग काय, फॉलोअर्स आणि फॅन्सचे आभार तर मानायला हवे. यासाठी सिद्धार्थने काय केले माहितीयं?? एक नवीन क्लिक शेअर करून त्याने चाहत्यांचे आभार मानले. पण हा क्लिक म्हणजे एखादी जुनी-पुरानी सेल्फी नव्हे तर करण जोहरच्या ‘अॅपने’ टीपलेला क्लिक आहे. होय, यात सिद्धार्थसोबत कोण आहे,माहितीय..करण जोहरचा जीव की प्राण त्याचा फॅमिली मेंबर नोबू जोहर. होय, करणचा लाडका कुत्रा. क्यूट ना!!