सिद्धार्थ -आलियाच्या प्रेमकहानीत कॅटरिना विलेन??
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 21:03 IST2016-05-17T15:33:37+5:302016-05-17T21:03:37+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेकअप सिझन सुरू आहे. ब्रेकअपच्या या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट या दोघांचे नाव सामील होण्याची ...

सिद्धार्थ -आलियाच्या प्रेमकहानीत कॅटरिना विलेन??
ब लिवूडमध्ये सध्या ब्रेकअप सिझन सुरू आहे. ब्रेकअपच्या या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट या दोघांचे नाव सामील होण्याची शक्यता आहे. आता तर या दोघांच्या प्रेमकहानीबद्दल नवीच माहिती समोर येतेयं. सिद्धार्थ व आलिया यांच्या दूराव्यास कॅटरिना कैफ कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. कॅटचे अलीकडे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाले. त्यापूर्वी सलमान खान याच्यासोबतही कॅटची बरीच जवळीक होती. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना चर्चेत आहे ती, सिद्धार्थसोबतच्या जवळीकतेमुळे. यामुळे साहजिकच आलिया प्रचंड नाराज आहे. अलीकडे एका चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये यासंदर्भात आलियाला विचारले असता, तिने जे काही उत्तर दिले, त्यावरून ‘दाल में जरूर कुछ काला है’, असाच संशय येतोय. ‘बार बार देखों’ या चित्रपटात सिद्धार्थ व कॅट एकत्र काम करताहेत. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही बरेच दंगामस्ती करताना दिसले. आपला पर्सनल ट्रेनर वापरण्याचा सल्लाही कॅटने सिद्धार्थला दिला. चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्येही दोघेही परस्परांमध्ये दंग झालेले दिसले. आता हे प्रेम की काय, हे ठाऊक नाही. प्रेम असेलच तर आलिया बेबीच्या दिलाचे हजार तुकडे होणे निश्चित आहे...!!