आलियाच्या विरहाने सिद्धार्थ व्याकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 16:54 IST2016-06-06T11:24:51+5:302016-06-06T16:54:51+5:30
आलिया भट्ट व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात ब्रेकअप झाले आहे. अर्थात सिद्धार्थ व आलिया या दोघांपैकी कुणीही यावर बोललेले नाही. ...
.jpeg)
आलियाच्या विरहाने सिद्धार्थ व्याकूळ!
आ िया भट्ट व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात ब्रेकअप झाले आहे. अर्थात सिद्धार्थ व आलिया या दोघांपैकी कुणीही यावर बोललेले नाही. ब्रेकअपनंतर आलिया ‘उडता पंजाब’च्या प्रमोशनमध्ये बिझी झालीय. पण सिद्धार्थ मात्र एकाकी पडलाय. आलियाच्या विरहाने सिद्धार्थ व्याकूळ झाला आहे. इतका की,एकांत शोधण्यासाठी तो देशाबाहेर गेलाय. होय, सिद्धार्थ मल्होत्रा सध्या मियामी येथे एकटाच सुटी घालवत असल्याची खबर आहे. आलियासोबतचे ब्रेकअप आणि तिचा विरह यातून सिद्धार्थ अद्यापही बाहेर पडू शकलेला नाही. त्यामुळेच तो कमालीचा हळवा झालाय आणि एकांत शोधतोय. सिद्धार्थच्या पुढील चित्रपटाचे शूटींग मियामीमध्ये आहे. ‘बँग बँग’च्या सिक्वलमध्ये सिद्धार्थ काम करणार आहे. मियामीमध्ये १० जूनपासून सिद्धार्थ या चित्रपटाचे शूटींग सुरु करतो आहे. पण तत्पूर्वी ३ जूनलाच सिद्धार्थ मियामीसाठी रवाना झाला आहे. येथे एकांतात राहून झाले गेले ते विसरण्याचा सिद्धार्थचा प्रयत्न आहे. सिद्धार्थ तुला या प्रयत्नांत यश येवो, एवढेच!!
![]()