सीक्रेट हॉलीडे संपवून सिद्धार्थ परतला..आलिया कुठेय??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 19:54 IST2016-06-26T14:24:09+5:302016-06-26T19:54:09+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या. पण कालपरवाच सिड व आलिया दोघेही लंडनमध्ये सीक्रेट हॉलीडे ...
.jpg)
सीक्रेट हॉलीडे संपवून सिद्धार्थ परतला..आलिया कुठेय??
स द्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या. पण कालपरवाच सिड व आलिया दोघेही लंडनमध्ये सीक्रेट हॉलीडे एन्जॉय करताना दिसल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होते. त्याचा एक फोटोही पुरावा म्हणून आम्ही दिला होता. आलिया मागच्या आठवड्यात हॉलीडेसाठी तिची बालपणीची मैत्रिण आकांक्षा रंजनसोबत लंडनला गेली होती. मग सिद्धार्थही ‘बँग बँग’चे शूटींग संपवून मियामी येथून लंडनला आलियाला जॉईन झाला होता. हे तिघेही लंडनमध्ये मौजमज्जा करताना दिसले होते. पण आत्ता आत्ता सिद्धार्थ मुंबई एअरपोर्टवर उतरलाय. सिद्धार्थला एअरपोर्टवर पाहून फोटोग्राफर्सचे कॅमेरे त्याच्याकडे वळले. पण हे काय, सिद्धार्थसोबत आलिया कुठेही दिसली नाही. कदाचित आलियाने हॉलीडे प्लॅन वाढवला असेल..नेमके काय, माहित नाही. पण सिडसोबत आलिया नव्हती, एवढेच खरे..आता बघूया आलिया बेबी कधी येते ते!!
![]()