सिद्धार्थ मल्होत्राने का भेटवले जॅकलिन फर्नांडिसला आपल्या पालकांना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 10:40 IST2017-09-23T04:57:51+5:302017-09-23T10:40:55+5:30
कितने अजीब रिश्ते है यहाँ पे असे बॉलिवूडचे वर्णन मधुर भांडारकरने पेज थ्री या चित्रपटात केले होते. खऱ्या आयुष्यात ...

सिद्धार्थ मल्होत्राने का भेटवले जॅकलिन फर्नांडिसला आपल्या पालकांना?
क तने अजीब रिश्ते है यहाँ पे असे बॉलिवूडचे वर्णन मधुर भांडारकरने पेज थ्री या चित्रपटात केले होते. खऱ्या आयुष्यात देखील बॉलिवूडची काहीशी अशीच स्थिती आहे. ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच दुसरे नाते जोडण्यासाठी ही मंडळी लगेचच तयार असतात. सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्या ब्रेकअप नंतर आता सिद्धार्थच्या आयुष्यात एक अभिनेत्री आली असून तो जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबतच घालवतो.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरचे किस्से गेल्या काही महिन्यांपासून बातम्यांमध्ये रंगत होते. सिद्धार्थ आणि आलिया अनेक ठिकाणी पार्ट्यांमध्ये देखील एकत्र दिसत होते. एवढेच नव्हे तर मुलाखतींमध्ये देखील अनेक वेळा एकमेकांविषयी बोलत असे. त्यामुळे सिद्धार्थ आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांच्या नात्यात आता दुरावा निर्माण झाला आहे.
सिद्धार्थ आणि आलिया यांचे ब्रेकअप झाले असून या ब्रेकअपसाठी एक अभिनेत्री जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थ आणि त्या अभिनेत्रीमध्ये निर्माण झालेल्या जवळीकतेमुळे सिद्धार्थ आणि आलिया यांचे ब्रेकअप झाले असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ गेल्या काही दिवसांपासून आलिया पेक्षा जॅकलिन फर्नांडिससोबत जास्त दिसत आहे. सिद्धार्थ आणि जॅकलिन यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. अ जेन्टलमॅन या चित्रपटात ते दोघे एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटासाठी सध्या ते चित्रीकरण देखील करत आहेत. याच चित्रीकरणा दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे म्हटले जाते.
सिद्धार्थने नुकत्याच केलेल्या एका गोष्टीमुळे तर यांच्या अफेअरविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण सिद्धार्थ नुकताच दिल्लीला गेला होता. त्याचे आई-वडील दिल्लीला राहातात. पण दिल्लीला तो एकटा न जाता तो जॅकलिनसोबत गेला होता आणि एवढंच नव्हे तर सिद्धार्थ जॅकलिनला आपल्या घरी डिनरसाठी घेऊन गेला होता. त्याने आपल्या पालकांना तिला भेटवले. तसेच त्याच्या जवळच्या मित्रांना देखील भेटवले. त्यामुळे दाल में कुछ काला है असेच आता सगळेच म्हणत आहेत.
Also Read : सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर ‘या’ एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पार्टी करताना दिसली आलिया भट्ट!