सिद्धार्थ मल्होत्राला आवडते ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 08:30 IST2018-10-11T16:16:12+5:302018-10-12T08:30:00+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आगामी चित्रपट 'जबरिया जोडी'मध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार आहे.

Siddharth Malhotra likes the thing | सिद्धार्थ मल्होत्राला आवडते ही गोष्ट

सिद्धार्थ मल्होत्राला आवडते ही गोष्ट

ठळक मुद्देसिद्धार्थ मल्होत्राला आवडते स्विमिंग करायला


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि अल्पावधीतच त्याने आपले स्थान निर्माण केले. सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तो सोशल मीडियावरून नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असतो आणि त्यांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देत असतो. त्याला नेहमी वेगवेगळ्या गोष्टी करून पाहण्यात रस आहे. त्याला पाण्यात डुबकी मारायला व स्विमिंग करायला आवडते. 

सिद्धार्थ मल्होत्रा आगामी चित्रपट 'जबरिया जोडी'मध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार आहे. या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. स्नायूमध्ये बळकटी येण्यासाठी तो स्विमिंग करतो. सिद्धार्थ म्हणाला की, संपूर्ण दिवस डान्स केल्यामुळे माझ्या हाताचे स्नायू दुखायला लागले. ते रिकव्हर होण्यासाठी वजन उचलण्यापेक्षा मी पाण्यात अॅक्टिव्हिटी करण्याचा निर्णय घेतला. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी स्विमिंग करतो. 
त्याने पुढे सांगितले की, 'सांध्यामधील दुखापतीपासून सुटका होण्यासाठी अॅथलेट स्विमिंग करतात. त्यामुळे मीदेखील हेक्टिक शेड्युल, अॅक्शन व डान्स सिक्वेन्स केल्यानंतर स्विमिंग करते. माझ्या वडीलांचे मी आभार मानतो. कारण बालपणापासून माझे समुद्राशी जवळचे नाते आहे. मी प्रमाणित स्कुबा डायव्हर आहे. जेव्हा मला कुठे पुल दिसतो तिथे मी माझा वेळ व्यतित करतो. पुलमध्ये उडी मारतो व स्विमिंग करतो. त्यामुळे लवचिकता व व्यायामदेखील होऊन जातो.'

'जबरिया जोडी'शिवाय सिद्धार्थ 'द मेजर विक्रम बत्रा' यांच्या जीवनावर आधारीत सिनेमातसुद्धा दिसणार आहे. बत्रा यांची भूमिका वठविणे म्हणजे एक मोठे आव्हान असल्याचे बोलला होता. सिद्धार्थ मल्होत्रा मेजर विक्रम बत्रा यांची भूमिका वास्तविक वाटण्यासाठी खूप मेहनत घेतो आहे. तसेच या भूमिकेबाबत त्याच्या मनावर खूप दडपणदेखील आहे. त्याला या वेगळ्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: Siddharth Malhotra likes the thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.