पती असावा तर असा! सिद्धार्थने प्रेग्नंट कियाराला गिफ्ट केली आलिशान कार, कोटींच्या घरात आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:23 IST2025-04-25T16:22:49+5:302025-04-25T16:23:59+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच आईबाबा होणार आहेत. आपल्या बाळाची आई होणाऱ्या कियाराला सिद्धार्थने लक्झरियस कार गिफ्ट केली आहे.

पती असावा तर असा! सिद्धार्थने प्रेग्नंट कियाराला गिफ्ट केली आलिशान कार, कोटींच्या घरात आहे किंमत
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच आईबाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थ-कियाराने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. प्रेग्नंट असलेल्या बायकोची म्हणजेच कियाराची सिद्धार्थ काळजी घेताना दिसत आहे. आपल्या बाळाची आई होणाऱ्या कियाराला सिद्धार्थने लक्झरियस कार गिफ्ट केली आहे.
सिद्धार्थने पत्नी कियाराला Toyota Vellfire ही महागडी कार गिफ्ट म्हणून दिली आहे. या कारची किंमत कोटींच्या घरात आहे. सिद्धार्थने कियाराला भेट म्हणून दिलेली ही कार १.१२ कोटींची आहे. कियारा आणि सिद्धार्थकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज मेबॅक S500, BMW X5, ऑडी A8L, BMW 530D और मर्सिडीज बेंज E क्लास या गाड्या आहेत. आता त्यात टोयोटोच्या गाडीची भर पडली आहे.
आपल्या बाळासाठी सिद्धार्थ-कियाराची जय्यत तयारी सुरू आहे. ते नवीन घर घेत असल्याच्या चर्चाही आहेत. काही दिवसांपूर्वीच इंटेरियर डिझायनर असलेल्या गौरी खानसोबत त्यांना एका बिल्डिंगमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. सिद्धार्थ-कियाराने २०२३ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर २ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.