सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'इत्तेफाक'चे टीजर साँग रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 11:01 IST2017-10-23T05:31:53+5:302017-10-23T11:01:53+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपट इत्तेफाकचे फारसे प्रमोशन झाले नसले तरीही प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाची उत्सुकता वाढलेली ...

Siddharth Malhotra and Sonakshi Sinha's Ittefaq's Teaser Song release | सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'इत्तेफाक'चे टीजर साँग रिलीज

सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'इत्तेफाक'चे टीजर साँग रिलीज

द्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपट इत्तेफाकचे फारसे प्रमोशन झाले नसले तरीही प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाची उत्सुकता वाढलेली दिसते आहे. सध्याच्या प्रोमोशनच्या ट्रेंडमध्ये असे घडणे ही या चित्रपटासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते. चित्रपटाचा निर्माता करण जोहर फक्त प्रिंट आणि डिजिटल मीडियावर या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. त्यामुळे आपल्याला या चित्रपटाचे ट्रेलर टीव्हीवर दिसत नाही विशेष म्हणजे या चित्रपटात  गाणी ही नाही आहेत. सोनाक्षी आणि सिद्धार्थने या चित्रपटासाठी इत्तेफाक नावाचे टीजर साँग नुकतेच शूट केले आहेत. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे बॉलिवूडमधील क्लासिक हिट 'रात बाकी'  या गाण्याला री- क्रीऐट केले आहे.

'रात बाकी' हे गाणे १९८२ साली आलेला नमक हलाल या चित्रपटातील आहे. हे गाणे अमिताभ बच्चन शशी कपूर आणि परवीन बाबी हिच्यावर चित्रित केले होते आणि हे गाणे आशा भोसले आणि बप्पी लहरीने गायले होते, आता ह्या गाण्याचे नवीन व्हर्जन सिद्धार्थ आणि सोनाक्षीवर चित्रित करण्यात आले आहे. नुकतेच या टीजर साँगचे शूटिंग पूर्ण झाले असून हे गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ALSO READ :  WATCH : ​जबरदस्त सस्पेन्स अन् थ्रील! ‘इत्तेफाक’चा ट्रेलर आला!

या टीजर साँगमध्ये सोनाक्षी आणि सिद्धार्थ पावसात भिजताना दिसणार आहे तर अक्षय खन्ना हातात छत्री घेऊन उभा आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरबरोबर शाहरुख खान सुद्धा करतो आहे. सिद्धार्थ या चित्रपटात विक्रमची भूमिका साकारतोय तर सोनाक्षी माया नामक व्यक्तिरेखेत दिसणार आहे.  चित्रपटात अक्षय खन्ना पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत एक डबल मर्डर मिस्ट्री सोडवताना दिसणार आहे.  सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना चा हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर ला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. फुल सन्स्पेन्स आणि फुल थ्रील शिवाय सिद्धार्थ आणि सोनाक्षीचा एकदम नवा अवतार हे सगळे बघणे इंटरेस्टिंग आहे. अभय चोप्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. .

Web Title: Siddharth Malhotra and Sonakshi Sinha's Ittefaq's Teaser Song release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.