मिलिए नए बंटी और बबली से...! झाली ‘बंटी और बबली 2’ची घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:14 IST2019-12-17T15:12:51+5:302019-12-17T15:14:16+5:30
लवकरच ‘बंटी और बबली 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या सीक्वलमध्ये अभिषेक-राणी नाही तर एक नवी जोडी बंटी आणि बबलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मिलिए नए बंटी और बबली से...! झाली ‘बंटी और बबली 2’ची घोषणा!
अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीचा ‘बंटी और बबली’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटाचा सीक्वल येणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर यशराज फिल्म्सने यावर शिक्कामोर्तब केले. लवकरच ‘बंटी और बबली 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या सीक्वलमध्ये अभिषेक-राणी नाही तर एक नवी जोडी बंटी आणि बबलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. होय, ‘गली बॉय’चा स्टार सिद्धांत चतुर्वेदी या सिनेमात बंटीची भूमिका साकारणार आहे. तर बबलीच्या भूमिकेत शर्वरी या नव्या हिरोईनची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षभरापासून शर्वरीला या भूमिकेसाठी प्रशिक्षीत केले जात आहे.
आज यशराज फिल्म्सने ‘बंटी और बबली 2’ची घोषणा करत सिद्धांत व शर्वरीचा फोटो शेअर केला. भेटा नव्या बंटी आणि बबलीला, असे हा फोटो शेअर करताना यशराज फिल्म्सने लिहिले.
‘बंटी और बबली 2’ हा शर्वरीचा पहिला सिनेमा असेल. यशराज फिल्म्स तिला लॉन्च करत आहे. याशिवाय एका नव्या दिग्दर्शकालाही या चित्रपटाद्वारे लॉन्च केले जाणार आहे. होय, वरूण शर्मा ‘बंटी और बबली 2’चे दिग्दर्शन करणार आहे. वरूणने याआधी सुल्तान व टायगर जिंदा है यासारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. आदित्य चोप्रा ‘बंटी और बबली 2’चा निर्माता असेल.
चित्रपटात बंटीची भूमिका साकारणा-या सिद्धांतने ‘गली बॉय’ या सिनेमात रॅपर एमसी शेरची भूमिका साकारली होती.