श्यामलन् यांच्या​ नव्या मालिकेत झळकणार निमरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 06:15 IST2016-03-01T13:14:02+5:302016-03-01T06:15:17+5:30

बहुप्रतिभाशाली अभिनेत्री निमरत कौर आपल्या दुसºया  इंटरनॅशनल टीव्ही प्रोजेक्टसाठी अतिशय उत्सूक आहे. भारतीय-अमेरिकन संवाद लेखक एम. नाईट. श्यामलन् यांच्या ...

Shyamalan will be seen in the new series | श्यामलन् यांच्या​ नव्या मालिकेत झळकणार निमरत

श्यामलन् यांच्या​ नव्या मालिकेत झळकणार निमरत

ुप्रतिभाशाली अभिनेत्री निमरत कौर आपल्या दुसºया  इंटरनॅशनल टीव्ही प्रोजेक्टसाठी अतिशय उत्सूक आहे. भारतीय-अमेरिकन संवाद लेखक एम. नाईट. श्यामलन् यांच्या ‘वेवार्ड पाइन्स’ या अमेरिकन टीव्ही सिरिअलमध्ये  निमरत एका शिल्पकाराची भूमिका साकारत आहे.
 ‘एयरलिफ्ट’मध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाचे दर्शन घडवणाºया निमरतने यापूर्वी ‘होमलँड-४’मध्ये काम केले होते. श्यामलन् यांची मालिका ब्लेक क्राऊचची कादंबरी वेवार्ड पाइन्सवर आधारित आहे. यात निमरत रेबेका नामक मुलीची भूमिका साकारत आहे. ती एक शिल्पकार असते. रहस्यमय वळणाने जाणाºया या मालिकेतील रेबेकाचे व्यक्तिमत्व हळूहळू प्रेक्षकांना उलगडत जाते. येत्या महिन्यात या मालिकेचे चित्रीकरण सुरु होणे अपेक्षित आहे.

Web Title: Shyamalan will be seen in the new series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.