श्रुती हासन आणि मायकेलचे झाले ब्रेकअप, लवकरच अडकणार होते लग्न बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 10:40 IST2019-04-26T10:35:20+5:302019-04-26T10:40:11+5:30

अभिनेत्री श्रुती हासन तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. गेल्या दोन वर्षांपासून  श्रुती मायकेल कोर्सेलला डेट करते आहे.

Shruti Hassan and Michael Corsale had breakup | श्रुती हासन आणि मायकेलचे झाले ब्रेकअप, लवकरच अडकणार होते लग्न बंधनात

श्रुती हासन आणि मायकेलचे झाले ब्रेकअप, लवकरच अडकणार होते लग्न बंधनात

ठळक मुद्दे श्रुतीसोबत मायकेल नेहमीच भारतात फिरताना दिसायचाश्रुती मायकेल कोर्सेलसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा होती

अभिनेत्री श्रुती हासन तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. गेल्या दोन वर्षांपासून  श्रुती मायकेल कोर्सेलला डेट करते आहे. मायकेल कोर्सेलसोबत श्रुतीचे रिलेशनशीप 2016मध्ये सुरु झालं. श्रुतीच्या वाढदिवसाला हे कपल जानेवारीमध्ये लॉस ऐंजिलिसमध्ये होते. श्रुतीसोबत मायकेल नेहमीच भारतात फिरताना दिसायचा. लवकरच श्रुती मायकेल कोर्सेलसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा होती. ऐवढंच नाही तर श्रुतीने वडील कमल कमल हासनसोबत मायकेलची भेटदेखील घालून दिली होती.

मायकेलने कमल हासनच्या 'विश्वरुपम 2' मध्ये भूमिकादेखील साकारली होती. गेल्या महिन्यापर्यंत यांच्यामध्ये सगळं काही ठिक चाललं होते. मात्र अचानक माशी कुठे शिंकली ते कळले नाही. श्रुती आणि मायकेलचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.  


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या एका महिन्यांपासून दोघांनी आपलं रस्ते बदलले आहेत. ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. 


श्रुती व मायकेल या दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती. श्रुती याठिकाणी एका ब्रिटीश रॉकबँडसोबत एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गेली होती. पहिल्याच भेटीत श्रुती व मायकेल दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे दोघांचेही डेटिंग सुरु झाले. मायकेल हा एक ब्रिटीश आर्टिस्ट आहे. लंडनस्थित ‘डिप डायविंग’ या थिएटर ग्रूपशी तो जुळलेला आहे. श्रुतीने ब्रेकअपनंतर मायकेलसोबतच्या काही पोस्ट देखील सोशल मीडियावरुन डिलीट केल्या आहेत.  

Web Title: Shruti Hassan and Michael Corsale had breakup