मराठमोळ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? चित्रविचित्र लूक पाहून चाहते पडले संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 17:19 IST2020-01-07T17:17:36+5:302020-01-07T17:19:05+5:30
आगळ्यावेगळ्या गेटअपमध्ये या अभिनेत्रीला ओळखणं कठीण झालं आहे.

मराठमोळ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? चित्रविचित्र लूक पाहून चाहते पडले संभ्रमात
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच तिची हाऊस अरेस्ट ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. नुकताच तिचा भांगडा पा ले हा चित्रपट रिलीज झाला आहे.
श्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. मात्र नुकताच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती ओळखतादेखील येत नाही आहे. तिने शेअर केलेला हा फोटो एका मासिकाच्या कव्हरफोटोवरील आहे. तिचा हा लूक चित्रविचित्र वाटतो आहे.
श्रिया पिळगावकरने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है' आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरिएड ड्रामा 'बीचम हाऊस'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.
इतकेच नाही तर 'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
श्रिया पिळगावकरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, २०१९ वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली असून मी हाथी मेरे साथी चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करायला मजा येणार आहे आणि या चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.