बोल्ड सीनवर करण्याबद्दल सचिन-सुप्रिया पिळगावकरांची लेक श्रियानं मांडलं स्पष्ट मत, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 09:33 IST2025-06-05T09:32:53+5:302025-06-05T09:33:06+5:30
बोल्ड सीन करताना 'पिळगावकर' आडनावचं दडपण येतं का?

बोल्ड सीनवर करण्याबद्दल सचिन-सुप्रिया पिळगावकरांची लेक श्रियानं मांडलं स्पष्ट मत, म्हणाली...
Shriya Pilgaonkar On Doing Bold Scenes: मराठीतील लोकप्रिय जोडी सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावकर यांची 'एकुलती एक' मुलगी श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) सध्या चर्चेत आहे. ती लवकरच 'छलकपट' या नवीन ओटीटी सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने श्रियाने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या भूमिकांबाबत, विशेषतः बोल्ड सीन संदर्भातील मत मांडलं आहे. बोल्ड सीन करताना कोणते विचार डोक्यात असतात? आई-वडिलांशी याबाबत संवाद होतो का? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे तिने दिली.
बोल्ड सीन करताना कलाकार म्हणून मी स्वत:वर मर्यादा घालू शकत नाही, असं मत श्रियानं माडलं. ती म्हणाली, "माझ्या मते, ऑफस्क्रीन संस्कार हे ऑनस्क्रीन संस्कारांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. मला स्वतःच्या ऑनस्क्रीन संस्कारांवर विश्वास आहे. कलाकार म्हणून मी स्वत:वर मर्यादा घालू शकते असं मला वाटत नाही, किंवा तसं करणंही योग्य वाटत नाही. काळानुसार गोष्टी मांडण्याची पद्धत बदलली आहे. कामातील मर्यादा आणि सहजता देखील पूर्वीपेक्षा वेगळी झाली आहे".
श्रिया पुढे म्हणाली, "प्रेमकथांमध्ये मुलगा-मुलगी हे किस करताना दाखवले जातात. अशा सीनसाठी मी नाही म्हणणार नाही. पण ते पडद्यावर कसे सादर होणार आहेत, त्यामागची भावना काय आहे, हे महत्त्वाचं आहे. मला ते कळतं आणि त्यानुसार मी भूमिका स्वीकारते".
बोल्ड सीनबाबत ती म्हणाली, "एखाद्या सीरिजमधील बोल्ड सीनमुळे त्याचं थेट मूल्यमापन करू नये. कारण ती त्या-त्या कथेची गरजही असते. त्यामुळे मला वाटतं की, अशा सीनमागची तुमचा हेतु महत्त्वाचा आहे. यासाठी आई-वडील मला नेहमीच पाठींबा देतात. पण त्यांना माहीत आहे की, मलाही ते निर्णय घेण्याचं स्वतंत्र आहे. पण इंटरनेटवर काहीही होऊ शकतं. फेक व्हिडीओ वगैरे काहीही होऊ शकतं".
दरम्यान, श्रियाची 'छलकपट' ही सीरिज आज ५ जून २०२५ रोजी ZEE5 वर प्रदर्शित होत आहे.