श्रेयस तळपदेची भरारी! मिळालं 'सिल्व्हर प्ले बटन', युट्यूबवर किती सबस्क्राईबर झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:25 IST2025-10-30T16:23:52+5:302025-10-30T16:25:36+5:30
श्रेयसने स्वतःचं युट्युब चॅनल सुरू केलं होतं आणि अवघ्या काही दिवसांतच त्याने एक मोठी कामगिरी केली आहे.

श्रेयस तळपदेची भरारी! मिळालं 'सिल्व्हर प्ले बटन', युट्यूबवर किती सबस्क्राईबर झाले?
मनोरंजन क्षेत्रातील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. लोकप्रिय मराठी आणि हिंदी अभिनेता श्रेयस तळपदेनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रेयस ने अभिनयाच्या जोडीला आता डिजिटल दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वीच श्रेयसने स्वतःचं युट्युब चॅनल सुरू केलं होतं आणि अवघ्या काही दिवसांतच त्याने एक मोठी कामगिरी केली आहे.
युट्युब चॅनल सुरू केल्यानंतर अल्पावधीतच श्रेयस तळपदेच्या चॅनलने १ लाख सबस्क्राइबर्सचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या यशाबद्दल, युट्युबने श्रेयसला खास भेट म्हणून 'सिल्व्हर प्ले बटन' दिले. श्रेयसने हे सिल्व्हर प्ले बटन हातात घेऊन आपला आनंद व्यक्त करणारे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने आभार मानले आहेत.
श्रेयसनं लिहलं, "आपल्या यूट्यूब प्रवासात थोडीशी 'सिल्व्हर लाईनिंग जोडली आहे. युट्यूब इंडियाचे आणि माझ्या सर्व Subscriber Familyचे मनःपूर्वक धन्यवाद... तुमच्यामुळेच हे शक्य झालं! हा सन्मान मला अजून जास्त जोमाने कंटेंट तयार करण्याची आणि तुम्हा सर्वांना मनोरंजन देण्याची प्रेरणा देतो. लवकरच आणखी अनेक सरप्राइजेस घेऊन येणार आहे. नेहमीप्रमाणे प्रेम असंच राहू द्या" असं अभिनेत्यानं म्हटलं.
फक्त श्रेयस तळपदेच नव्हे, तर अनेक कलाकारांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या यादीत अर्चना पुरण सिंग, फराह खान, परिणीती चोप्रा, प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, अजय देवगण आणि अर्जुन कपूर यांसारख्या लोकप्रिय नावांचा समावेश आहे. हे सगळे कलाकार त्यांच्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करतात — कुणी कुकिंगचे व्हिडिओ टाकतात, तर कुणी फिटनेस टिप्स, फॅशन, चित्रपटांच्या प्रमोशनचे व्हिडिओ, व्लॉग्स किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करतात.