श्रेयस तळपदेने भरले पाण्याचे फुगे, लाडक्या लेकीनेही केली मदत, क्यूट व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 12:22 IST2024-03-25T12:20:36+5:302024-03-25T12:22:43+5:30

श्रेयस तळपदेने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो आणि त्याची लाडकी लेक रंगपंचमी उत्साहात साजरी करताना दिसत आहे

Shreyas Talpade filled water balloons, beloved girl also helped, cute video went viral | श्रेयस तळपदेने भरले पाण्याचे फुगे, लाडक्या लेकीनेही केली मदत, क्यूट व्हिडीओ व्हायरल

श्रेयस तळपदेने भरले पाण्याचे फुगे, लाडक्या लेकीनेही केली मदत, क्यूट व्हिडीओ व्हायरल

रंगपंचमीचा माहोल सगळीकडे आहे. अनेक कलाकार आज त्यांच्या कुटुंबासोबत उत्साहात रंगपंचमी साजरी करताना दिसत आहेत. अशातच अभिनेता श्रेयस तळपदेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात तो त्याच्या लाडक्या लेकीसोबत रंगपंचमीचं खास सेलिब्रेशन करताना दिसतोय. श्रेयस आणि त्याच्या लेकीचा खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

श्रेयसच्या लेकीचं नाव आहे आद्या. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, श्रेयस आणि आद्या किचनमध्ये आहेत. श्रेयस किचनमधील नळाच्या पाण्याखाली फुगे धरून ते भरत आहे. फुगे भरून श्रेयस बालडीत ते फुगे ठेवत आहे.  दुसरीकडे त्याची लेक आद्याही बाबाला मदत करताना दिसतेय. आद्या पिचकारीच्या सहाय्याने पाण्याने फुगे भरताना दिसत आहे. श्रेयस आणि आद्याचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. 

व्हिडीओ शेअर करताना 'हॅपी होली' असं कॅप्शन श्रेयसने या व्हिडीओला दिलंय. "खूप मस्त.. बाप -लेक आणि धमाल मस्ती.... होळीच्या रंगमय शुभेच्छा तुम्हांला व संपूर्ण परिवाराला, हे पाहून गोड आठवणी ताज्या झाल्यात आज", "विविध रंगाप्रमाणे तुमचे आयुष्य नेहमी हसत- खेळत, आनंदाने परिपूर्ण भरलेले असावे, Happy Holi Talpade Family" अशा कमेंट करत लोकांनी या व्हिडीओचं कौतुक केलंय. दरम्यान हार्ट अटॅकवर मात केल्यावर श्रेयस 'वेलकम टू जंगल'  सिनेमाचं शुटींग करत आहे.

Web Title: Shreyas Talpade filled water balloons, beloved girl also helped, cute video went viral