श्रेया घोषाल दिसणार 'मादाम तुसाँ'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 19:45 IST2017-03-15T14:15:45+5:302017-03-15T19:45:45+5:30

श्रेया याबाबत खूपच उत्साहित दिसली. मी मादाम तुसाँचा एका भाग होण्यासाठी उत्सुक असल्याचे श्रेया म्हणाली. इतके मोठे इतिहासकार दिग्गज ...

Shreya Ghoshal will appear in 'Madam Tusson' | श्रेया घोषाल दिसणार 'मादाम तुसाँ'मध्ये

श्रेया घोषाल दिसणार 'मादाम तुसाँ'मध्ये

रेया याबाबत खूपच उत्साहित दिसली. मी मादाम तुसाँचा एका भाग होण्यासाठी उत्सुक असल्याचे श्रेया म्हणाली. इतके मोठे इतिहासकार दिग्गज कलाकारांमध्ये आपल्याही समावेश होत असल्यामुळे ती फारच आनंद असल्याचे श्रेया म्हणाली. नेहमीसाठी अमर होणं ही संकल्पना मला खूप भावली आहे. 
दिल्लीतल्या  मादाम तुसाँ संग्रहालयात 50 विविध क्षेत्रातील दिग्गज आणि प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये इतिहास, क्रीडा, संगीत, चित्रपट, आणि टेलिव्हिजन अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या पुतळ्याची झलक पाहता येणार आहे.याठिकाणी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिग बी अमिताभ बच्चन, अमेरिकन पॉप स्टार लेडी गागा यांच्याही मेणाच्या पुतळे दिसणार आहेत. श्रेयाने तेरी मेरी प्रेम कहानी, डोला रे डोला, दिवानी मस्तानी, अगर तुम मिल जाओ, सुन रहा है न तू अशा अनेक गाण्यांना आपला सुमधुर आवाज देऊन त्यांना प्रसिद्धीच्या एका वेगळाच उंचीवर नेऊन ठेवले आहे. मर्लिन एन्टरटेन्मेटचे प्रा. लि.चे महाव्यवस्थापक अंकुश जैन म्हणाले दिल्लीतल्या या मादाम तुसाँ संग्रहालयात श्रेयाच्या पुतळ्याचे अऩावरण करण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. सध्याच्या आघडीच्या गायिकांपैकी ती एक आहे. श्रेयाचा पुतळा या ठिकाणी लावण्यात यावा अशी तिच्या चाहत्यांची मागणी होती. ती पूर्ण करण्यात येतेय याचा आम्हाला आनंद आहे. 

Web Title: Shreya Ghoshal will appear in 'Madam Tusson'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.