प्रभासच्या 'साहो'मध्ये श्रद्धा कपूर दिसणार डबल रोलमध्ये.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 14:27 IST2017-09-09T08:38:16+5:302017-09-09T14:27:34+5:30

काही चित्रपटांची वाट प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने करत असतात. या चित्रपटांपैकी एक चित्रपट साहो. याचित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे प्रभास. ...

Shraddha Kapoor will appear in double role in Prabhas' Saho ... Read More | प्रभासच्या 'साहो'मध्ये श्रद्धा कपूर दिसणार डबल रोलमध्ये.. वाचा सविस्तर

प्रभासच्या 'साहो'मध्ये श्रद्धा कपूर दिसणार डबल रोलमध्ये.. वाचा सविस्तर

ही चित्रपटांची वाट प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने करत असतात. या चित्रपटांपैकी एक चित्रपट साहो. याचित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे प्रभास. बाहुबली आणि बाहुबली 2 केल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी प्रभासनी साहो चित्रपट साईन केला आहे हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. प्रभासच्या अपोझिट याचित्रपटात आधी अनुष्का शेट्टीला घेण्याचा विचार सुरु होता मात्र तिला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्दा कपूरने रिप्लेस केले.सध्या साहोमध्ये श्रद्धा साकरणाऱ्या भूमिकेची चर्चा आहे. मि डे मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार या चित्रपटात श्रद्धाचा डबल रोल असणार आहे. अजून पर्यंत साहोच्या टीमकडून मात्र याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. 

ALSO READ :  बॅडमिंटन स्टार सायना नेहवालसोबत 'हसीना' श्रद्धा कपूरने सुरु केले काम!

साहोची अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि हिरो प्रभासची अद्याप एकमेकांशी भेट झालेली नाही. नुकतेच श्रद्धा कपूर हैदराबादला रवाना झाली आहे. श्रद्धा हैदराबादला साहोच्या शूटिंगसाठी पोहोचली असल्याचे सांगण्यात येते आहे. न भेटताच श्रद्धा आणि प्रभासमध्ये एकमेंकांच्या भाषा शिकवण्याबाबत एक करार. प्रभास तिला तामिळ आहे तर श्रद्धा त्याला हिंदी भाषा शिकवणार आहे. साहोत स्वतंत्र्य पूर्वीची कथा आहे. चित्रपटात काही दृष्य जुने दाखवण्यात येणार आहेत तर काही नवीन. यात श्रद्धा आणि प्रभाससह नील नितिन मुकेश, महेश मांजरेकर, चंकी पांडे हे ही झळकणार आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदीत भाषात रिलीज करण्यात येणार आहे. हिंदी डबिंतमध्ये प्रभास आपला आवाज देणार असल्याचे कळतेय.​ श्रद्धा कपूर सध्या सायना नेहवालकडून बॅडमिंटनचे धडे गिरवताना दिसतेय. श्रद्धा सायनाच्या बायोपिकमध्ये तिची भूमिका साकारणार आहे.   


 

Web Title: Shraddha Kapoor will appear in double role in Prabhas' Saho ... Read More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.