'स्त्री' नंतर श्रद्धा बनणार इच्छाधारी 'नागिण', ३ वर्षांपासून लिहिली जातेय स्क्रिप्ट, निर्माते म्हणाले- "जेव्हा तिला विचारलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:49 IST2024-11-15T14:49:02+5:302024-11-15T14:49:54+5:30

'स्त्री'नंतर आता श्रद्धा नागिण बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

shraddha kapoor to play naagin after stree 2 movie script took 3 years | 'स्त्री' नंतर श्रद्धा बनणार इच्छाधारी 'नागिण', ३ वर्षांपासून लिहिली जातेय स्क्रिप्ट, निर्माते म्हणाले- "जेव्हा तिला विचारलं..."

'स्त्री' नंतर श्रद्धा बनणार इच्छाधारी 'नागिण', ३ वर्षांपासून लिहिली जातेय स्क्रिप्ट, निर्माते म्हणाले- "जेव्हा तिला विचारलं..."

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. वडील शक्ती कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रद्धानेही बॉलिवूडची वाट धरली. २०१० साली श्रद्धाने 'तीन पत्ती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, २०१३ साली आलेल्या 'आशिकी २'ने तिला लोकप्रियता मिळवून दिली. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या श्रद्धाचा 'स्त्री' हा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली. अलिकडेच 'स्त्री २'प्रदर्शित झाला होता. 'स्त्री'नंतर आता श्रद्धा नागिण बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

खरं तर चार वर्षांपूर्वीच श्रद्धाला या सिनेमासाठी विचारण्यात आलं होतं. पण, गेल्या तीन वर्षांपासून या सिनेमाच्या कथेवर काम सुरू आहे. श्रद्धा कपूरच्या या सिनेमाचे निर्माते निखिल द्विवेदी यांनी नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नागिण सिनेमाबद्दल भाष्य केलं. सिनेमाची स्क्रिप्ट तयार करण्यासाठी ३ वर्ष लागल्याचं त्यांनी सांगितलं. श्रद्धा कपूरला हा सिनेमा ऑफर करण्याबाबत ते म्हणाले, "श्रद्धा या सिनेमाची पहिली कलाकार आहे. मीच तिच्याकजे सिनेमाची ऑफर घेऊन गेलो होतो. आणि तिने लगेच होकार दिला. सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यासाठी ती उत्साही आहे. आणि आता स्क्रिप्टही तयार आहे". 


लवकरच श्रद्धा कपूरच्या या नव्या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. श्रद्धाला इच्छाधारी नागिण म्हणून पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. २०२० मध्ये श्रद्धाच्या 'नागिण' या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा चाहत्यांनी तयार केलेले नागिण लूकमधील पोस्टर श्रद्धाने शेअर केले होते. आता तिच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Web Title: shraddha kapoor to play naagin after stree 2 movie script took 3 years