श्रद्धा कपूर म्हणतेय, रॉक ऑनमध्ये काम करणे हे माझे स्वप्न होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 16:20 IST2016-11-02T16:20:16+5:302016-11-02T16:20:16+5:30
प्राजक्ता चिटणीस शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने आज बॉलिवुडमध्ये स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. आता रॉक ऑन 2 या चित्रपटात ...

श्रद्धा कपूर म्हणतेय, रॉक ऑनमध्ये काम करणे हे माझे स्वप्न होते
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">प्राजक्ता चिटणीस
शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने आज बॉलिवुडमध्ये स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. आता रॉक ऑन 2 या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही गाणीदेखील तिने गायली आहे. या चित्रपटाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...
रॉक ऑन या चित्रपटाची तू फॅन असल्याने चित्रपटाच्या सिक्वलमध्ये तुला घेण्यात यावे असे तुला वाटत होते. त्यामुळे तू स्वतः निर्मात्यांना संपर्क साधला असे म्हटले जात आहे, हे खरे आहे का?
मी रॉक ऑन हा चित्रपट माझ्या कुटुंबियांसोबत पाहिला होता. त्यावेळीच मला हा चित्रपट इतका आवडला होता की, या चित्रपटाचा सिक्वल आला तर मला या चित्रपटात काम करायचे आहे असे मी तेव्हाच सगळ्यांना सांगितले होते. या चित्रपटाच्या सिक्वलची ज्यावेळी चर्चा सुरू झाली, तेव्हा मी स्वतःहून निर्मात्यांना फोन करून मला या चित्रपटाबाबत तुम्हाला भेटायचे आहे असे सांगितले. त्यावर या चित्रपटातील माझ्या व्यक्तिरेखेने स्वतःची गाणी स्वतः गावीत असे ठरले असल्याने मी अभिनयासोबत या चित्रपटात गायन करावे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी यशराज स्टुडिओत जाऊन गाणी गायली आणि अशाप्रकारे मी या चित्रपटाचा भाग बनले.
तुला गाण्याची केवळ आवड आहे की तू गाणे शिकलेदेखील आहेस?
माझे आईचे वडील म्हणजे माझे आजोबा पंढरीनाथ कोल्हापूरे हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीतकार होते. मी लहानपणी त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. तसेच मी काहीवेळा आईसोबतही गात असे. मला गायल्यनंतर एक वेगळाच आनंद मिळतो. मन एकदम शांत झाल्यासारखे वाटते. त्यामुळे गाणे ही गोष्ट मला मनापासून आवडते. माझ्या चित्रपटात मला गाण्याची संधी मिळत आहे यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.
तू रियाजासाठी वेळ कसा काढतेस?
सध्या तरी मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याने मला रियाजासाठी वेळ मिळत नाही. पण तरीही मी वेळ काढण्याचा प्रयत्न करते. मी आठवड्यातील काही दिवस तरी व्हॉइज एक्सरसाइज करते. रॉक ऑन चित्रपटातील गाणी गायच्याआधी मी सॅमन्था अॅडव्हर्डस यांच्याकडून व्हॉइज ट्रेनिंग घेतली होती. कारण पाश्चिमात्य संगीत कधी मी शिकले नसल्याने या चित्रपटातील गाणी गाणे माझ्यासाठी अवघड होते. पण ही गाणी रेकॉर्ड करताना मी खूप एन्जॉय केले.
तुला अभिनेत्रीच बनायचे आहे असे तू कधी ठरवलेस?
मला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. माझ्या वडिलांचे शोचे अतिशय रंगीबेरंगी कोट घरात असायचे ते मी घालून आरशासमोर अभिनय करायचे, नाचायचे. या सगळ्यामुळे मी चित्रपटसृष्टीतच करियर करणार याची माझ्या कुटुंबियांना चांगलीच कल्पना होती.
चित्रपट निवडताना वडिलांकडून काही सल्ला घेतेस का?
माझ्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट आली की, ती अनेकवेळा माझे वडीलदेखील वाचतात. त्यांना अनेक वर्षांचा अनुभव असल्याने मला त्यातील छोट्या छोट्या गोष्टीदेखील समजवून सांगतात. ते मला सल्ला नक्कीच देतात. पण मी निर्णय काय घ्यावा हे मी स्वतःच ठरवावे असे त्यांचे म्हणणे असते.
तुझे वडील एक प्रसिद्ध कॉमेडीयन आहेत, तू कधी कॉमेडी करायचा विचार नाही केलास का?
माझ्या वडिलांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. अंदाज अपना अपना या चित्रपटातील त्यांनी साकारलेला गोगो, राजा बाबू, सत्ते पे सत्ता या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखा मला खूप आवडतात. त्यांच्याप्रमाणे कॉमेडी करायला मला नक्कीच आवडेल. एखादी चांगली पटकथा आल्यास प्रेक्षकांना माझे एक वेगळे रूपदेखील पाहायला मिळेल.