मोठ्या पडद्यावर सायना नेहवाल साकारणार श्रद्धा कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 14:53 IST2017-04-26T09:20:12+5:302017-04-26T14:53:10+5:30
श्रद्धा कपूर आतापर्यंत अनेक अॅक्शन चित्रपटांव्दारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता लवकरच ती एक नाही तर तब्बल दोन-दोन बायोपिकमध्ये ...

मोठ्या पडद्यावर सायना नेहवाल साकारणार श्रद्धा कपूर
श रद्धा कपूर आतापर्यंत अनेक अॅक्शन चित्रपटांव्दारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता लवकरच ती एक नाही तर तब्बल दोन-दोन बायोपिकमध्ये दिसणार आहे. श्रद्धा हसीना या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहिणी हसीन पारकरची भूमिका साकारत आहे. यानंतर ती लवकरच भारतीचा फुलराणी बॅडमिंटन पटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. याचित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहेत. याचित्रपटात सायनाच्या भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव फायनल करण्यात आले आहे.
याचित्रपटाची निर्माती टी-सिरिजचे भूषण कुमार करत आहेत. 2018मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. श्रद्धाला कपूरने स्वत: सोशल मीडियावर आपण सायनाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार असल्याचे सांगितले आहे. श्रद्धा म्हणते, प्रत्येक मुलगी आपल्या शाळेच्या दिवसांत बॅटमिंटन खेळतेच. मी स्वत:ला भाग्यशाली समजते मला सायना नेहवालची भूमिका साकारायला मिळणार आहे. जी केवळ जगातील अव्वल दर्जाची खेळाडूच नाही तर यूथ आयकॉनसुद्धा आहे. मी ही भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे.
सायना आणि श्रद्धा कपूर यांच्यात चांगली मैत्री असल्यामुळे श्रद्धाला बॅडमिंटन शिकण्यात सायनाची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या तिने केलेल्या भूमिकांपैकी ही भूमिका सगळ्यात कठीण असणार आहे असे श्रद्धाचे म्हणणे आहे. सायना नेहवालची भूमिका साकारणे तिच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.
भारतात खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणे ही काही नवीन बाब राहिलेली नाही. याआधी ही बॉक्सिंग पटू मेरी कॉम, क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी, धावपटू मिल्खा सिंह यांच्या चित्रपट तयार करण्यात आले आणि ते सुपरहिट ही झाले.