"खूप भाग्यवान आहे नाही का?" श्रद्धा कपूरची नवी पोस्ट, राहुलसोबतच्या अफेअरच्या चर्चांना हवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:17 IST2025-10-06T16:17:23+5:302025-10-06T16:17:50+5:30
श्रद्धा कपूरची नवी पोस्ट चर्चेत आली आहे.

"खूप भाग्यवान आहे नाही का?" श्रद्धा कपूरची नवी पोस्ट, राहुलसोबतच्या अफेअरच्या चर्चांना हवा!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. श्रद्धा आणि लेखक-निर्माता राहुल मोदी हे एकमेंकाना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच, श्रद्धा कपूरने नुकतेच काही कॅज्युअल फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत श्रद्धानं दिलेल्या कॅप्शनमुळे चाहत्यांना खात्री झाली आहे की, हे फोटो राहुल मोदीनेच काढले आहेत.
श्रद्धानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने हलक्या गुलाबी रंगाचा साधा टी-शर्ट परिधान केलाला दिसतोय. मोकळे केस आणि नो-मेकअप लूक तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. या फोटोंपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले ते तिच्या कॅप्शनने. या फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलंय, "कुछ जादा लकी नहीं हो गया फोटो खींचनेवाला??". श्रद्धाच्या या खास आणि सूचक कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये लगेचच तर्कवितर्क सुरू झाले. चाहते असा अंदाज लावत आहेत हे सुंदर फोटो राहुल मोदीनेच काढले असावेत.
राहुल आणि श्रद्धा यांनी आपल्या नात्याची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, श्रद्धाच्या पोस्टमधून तिने अनेकदा चाहत्यांना रिलेशनशिपच्या हिंट दिल्या आहेत. श्रद्धा ३८ वर्षांची असून ती लग्न कधी करणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. श्रद्धा कपूर सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय आहे. तिचे तब्बल ९३.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसंच इन्स्टाग्रामवर तिच्या पोस्ट आणि कॅप्शन्स इंटरेस्टिंग असतात. त्यातून तिचा साधेपणा आणि मराठमोळं वागणं दिसून येतं.