राहुल मोदीच्या प्रेमात आकंठ बुडाली श्रद्धा कपूर, आतापर्यंत कुणाकुणाला डेट केलं माहितेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:35 IST2025-03-03T15:35:36+5:302025-03-03T15:35:48+5:30

राहुल मोदीच्या आधी श्रद्धानं कुणाकुणाला डेट केलं आहे.

Shraddha Kapoor Love Affair With Aditya Roy Kapur Farhan Akhtar Rohan Shrestha Rahul Mody See Details | राहुल मोदीच्या प्रेमात आकंठ बुडाली श्रद्धा कपूर, आतापर्यंत कुणाकुणाला डेट केलं माहितेय का?

राहुल मोदीच्या प्रेमात आकंठ बुडाली श्रद्धा कपूर, आतापर्यंत कुणाकुणाला डेट केलं माहितेय का?

Shraddha Kapoor: 'स्त्री २' मधून घवघवीत यश व प्रसिद्धी मिळवणारी श्रद्धा कपूर ही आज आघाडीची अभिनेत्री आहे. श्रद्धा कपूर ही शक्ती कपूरची लेक आहे. पण, स्टारकीड असूनही श्रद्धाला बॉलिवूडमध्ये नाव कमावाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलाय. आपल्या मेहनतीच्या बळावर तिनं मोठं नाव कमावलं आहे. मराठमोळ्या संस्कारात वाढलेल्या श्रद्धावर तिचे चाहते प्रचंड प्रेम करतात. नेटकऱ्याची तर ती विशेष लाडकी आहे. पण, श्रद्धाचा लाडका आहे तो राहुल मोदी. श्रद्धा ही राहुल मोदीच्या (Rahul Mody) आकंठ प्रेमात आहे. पण, तुम्हाला माहितेय राहुल मोदीच्या आधी श्रद्धानं कुणाकुणाला डेट (Shraddha Kapoor Love Affair) केलं आहे.

आजवर अनेक अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं आहे. पण, यात पहिलं नाव येतं ते म्हणजे आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur ). श्रद्धा आणि आदित्य यांचं एकमेंकावर खूप प्रेम होतं. पण, दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ब्रेकअप झालं. आदित्यनंतर श्रद्धाच्या आयुष्यात फरहान अख्तर (Farhan Akhtar) आला. 'रॉक ऑन २' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक आल्याची चर्चा होती. पण, शक्ती कपूर यांना फरहान हा जावाई म्हणून नको होता. फरहान आणि श्रद्धात वयाचं मोठं अतंर अंतर असल्याने त्यांचा या नात्याला विरोध होता. अखेर त्यांच्या नात्याचा अंत झाला. 

श्रद्धाचं नाव सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबतही जोडलं गेलं होतं. त्यांच्या तर लग्नाच्याही अफवा पसरल्या होत्या. आता सध्या श्रद्धा राहुल मोदीला डेट करतेय. ते बरेचदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले आहेत. राहुल व्यवसायाने पटकथा लेखक आहे. श्रद्धा आणि रणबीर कपूरचा 'तू झूठी मै मक्कार' सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचं लेखन राहुल मोदीनेच केलं होतं. तेव्हापासून दोघांचं जुळल्याच्या चर्चा होत्या. मध्यंतरी श्रद्धाने राहुलला अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्याही चर्चा झाल्या. पण, ते पुन्हा एकत्र दिसलेत. दोघांची जोडी चाहत्यांनाही प्रचंड आवडते. 

Web Title: Shraddha Kapoor Love Affair With Aditya Roy Kapur Farhan Akhtar Rohan Shrestha Rahul Mody See Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.