श्रद्धाने आदित्य रॉय कपूरला मारली मिठी, बाजूलाच उभी होती अनन्या पांडे; नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 19:33 IST2024-03-01T19:33:07+5:302024-03-01T19:33:33+5:30

श्रद्धा आणि अनन्या यांनी एकमेकांना थेट इग्नोर केल्याचंही पाहायला मिळालं.

Shraddha Kapoor hugged Aditya Roy Kapur while Ananya Pandey was standing by video | श्रद्धाने आदित्य रॉय कपूरला मारली मिठी, बाजूलाच उभी होती अनन्या पांडे; नेटकरी म्हणाले...

श्रद्धाने आदित्य रॉय कपूरला मारली मिठी, बाजूलाच उभी होती अनन्या पांडे; नेटकरी म्हणाले...

रिलायन्स इंडस्ट्रीचे संचालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या (Anant Ambani) प्री वेडिंगची सध्या देशभरात चर्चा आहे. गुजरातमधील जामनगर येथे आजपासून ३ दिवस प्रीवेडिंग सोहळा पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबिनयांनी अन्नदान केलं. तर आता प्री वेडिंगचे काही फंक्शन्सही होणार आहेत. अनंत अंबानी लहानपणीची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत जुलैमध्ये मुंबईत लग्नगाठ बांधणार आहे. या प्रीवेडिंगसाठी अख्खं बॉलिवूड आज जामनगरला रवाना झालं. कलिना विमानतळावर बॉलिवूडचे सगळे टॉपचे कलाकार दिसले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या बॉलिवूडमधलं चर्चेतलं कपल आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) आणि अनन्या पांडे (Ananya Panday)देखील अंबानींच्या प्रीवेडिंग कार्यक्रमांसाठी पोहोचले. कलिना विमानतळावर अनन्या, सारा अली खान, शनाया कपूर, खुशी कपूर, सैफ-करीना, करिष्मा कपूरसह अनेक मंडळी दिसली. यावेळी श्रद्धा कपूरही (Shraddha Kapoor) तिथेच होती. श्रद्धा आणि आदित्यने एकमेकांना पाहताच विचारपूस केली. मिठी मारली. तेव्हा अनन्या बाजुलाच उभी होती. अनन्या आणि श्रद्धा दोघींनी एकमेकींना थेट इग्नोर केलं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सेलिब्रिटींचे व्हिडिओ पाहून नेटकरीही त्यांची मजा घेत आहेत.'एकाच ठिकाणी एक्स आणि सध्याची गर्लफ्रेंड पण','हे तर अंबानीच करु शकतात' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. श्रद्धा आणि आदित्य दोघंही काही काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांचं नातं फार पुढे गेलं नाही. आता आदित्य अनन्यासोबत असून अनेकदा दोघंही हातात हात घालून फिरताना दिसतात. त्यांच्या अफेअरची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

Web Title: Shraddha Kapoor hugged Aditya Roy Kapur while Ananya Pandey was standing by video