श्रद्धा कपूरने वडिलांसोबत जुहूमध्ये विकत घेतला करोडोंचा आलिशान अपार्टमेंट, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:17 IST2025-01-21T10:15:48+5:302025-01-21T10:17:20+5:30

Shraddha Kapoor And Shakti Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'स्त्री २' चित्रपटाच्या यशानंतर तिचे वडील शक्ती कपूर यांच्यासोबत मुंबईत करोडोंची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

Shraddha Kapoor bought a luxurious apartment worth crores in Juhu with her father Shakti Kapoor, know the price | श्रद्धा कपूरने वडिलांसोबत जुहूमध्ये विकत घेतला करोडोंचा आलिशान अपार्टमेंट, जाणून घ्या किंमत

श्रद्धा कपूरने वडिलांसोबत जुहूमध्ये विकत घेतला करोडोंचा आलिशान अपार्टमेंट, जाणून घ्या किंमत

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor)ने 'स्त्री २' (Stree 2) चित्रपटाच्या यशानंतर तिचे वडील शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांच्यासोबत मुंबईत करोडोंची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. आलिशान कारनंतर आता त्यांनी आलिशान घरासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. सध्या ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. पण या नवीन घरी ती शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आलिशान फ्लॅटसाठी अभिनेत्रीने किती रक्कम मोजली आहे, ते जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या या प्रॉपर्टीची किंमत ६.२४ कोटी रुपये आहे. हा एक लक्झरी अपार्टमेंट आहे, जो तिने या किमतीत विकत घेतला आहे. हे पिरामल महालक्ष्मी साउथ टॉवर येथे आहे आणि त्याची नोंदणी १३ जानेवारी २०२५ रोजी झाली होती. १०४२.७३ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या अपार्टमेंटमध्ये दोन बाल्कनी आहेत आणि त्याची प्रति स्क्वेअर फूट किंमत ५९, ८७५ रुपये आहे.

श्रद्धा कपूरने भाड्याने घेतले होते एक अपार्टमेंट 
पिरमल महालक्ष्मी साउथ टॉवर रेस कोर्स आणि समुद्राच्या दृश्यासाठी प्रसिद्ध असून तिथे 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स आहेत. श्रद्धा कपूरने २०२४ मध्ये जुहूच्या हाय एंड रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये ६ लाख रुपये प्रति महिना भाड्याने एक लक्झरी अपार्टमेंट घेतला होता. Zapkey ने अॅक्सेस केलेल्या कागदपत्रांनुसार, अंदाजे ३९२८.८६ चौरस फुटांचे हे अपार्टमेंट एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. अभिनेत्रीने ७२ लाख रुपये अॅडव्हान्स दिले होते. त्यात ४ पार्किंग क्षेत्रांचाही समावेश होता. त्यासाठी त्यांनी ३६ हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आणि १००० रुपये रजिस्ट्रेशन फी भरली होती.

वर्कफ्रंट
श्रद्धा कपूरने 'आशिकी २', 'बागी', 'छिछोरे' आणि 'स्त्री २' सारख्या चित्रपटात काम केले आहे. ती १२ वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रीय आहे. जरी तिच्या नावावर जास्त हिट्सची नोंद नाही. पण ती लोकांच्या मनावर राज्य करते. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्स सर्वाधिक आहेत. 'फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १००' च्या यादीत ती ५७ व्या क्रमांकावर होती.

Web Title: Shraddha Kapoor bought a luxurious apartment worth crores in Juhu with her father Shakti Kapoor, know the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.