6 Years Of Aashiqui2 : श्रद्धा कपूरला आठवली ‘आरोही’, सोशल मीडियावर बदलले नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 16:14 IST2019-04-26T16:13:41+5:302019-04-26T16:14:32+5:30
होय, श्रद्धाने सोशल मीडियावरचे स्वत:चे नाव बदलून ‘आरोही’ असे केले. याचे कारण म्हणजे, ‘आशिकी 2’.

6 Years Of Aashiqui2 : श्रद्धा कपूरला आठवली ‘आरोही’, सोशल मीडियावर बदलले नाव!!
सोशल मीडिया भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, यात काहीही दुमत नाही. सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करणा-या सेलिब्रिटींच्या यादीतील सर्वात ताजे नाव म्हणजे, श्रद्धा कपूर. होय, श्रद्धाने सोशल मीडियावरचे स्वत:चे नाव बदलून ‘आरोही’ असे केले आहे. साहजिकच यामागे कारणही खास आहे. याचे कारण म्हणजे, ‘आशिकी 2’.
होय, श्रद्धाच्या ‘आशिकी 2’ला सहा वर्षे पूर्ण झालीत. हा चित्रपट श्रद्धासाठी खास होता. ‘आशिकी 2’नेच श्रद्धाला खरी ओळख मिळवून दिली, असे म्हटले तर अतिशयोक्ती नाही. या चित्रपटात श्रद्धाने आरोही नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिने साकारलेली ही व्यक्तिरेखा आणि तिचे आरोही हे नाव आजही लोक विसरू शकलेले नाही. सोशल मीडियावर आरोही हे नवे नाव धारण करून श्रद्धाने ‘आशिकी 2’ला सहा वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन केले.
‘आशिकी 2’ हा चित्रपट २६ एप्रिल २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. १९९० साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘आशिकी’ या सिनेमाचा हा सीक्वल होता. मोहित सूरीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे आघाडीच्या भूमिकांमध्ये होते. ‘आशिकी’ प्रमाणे ‘आशिकी 2’चे संगीत देखील प्रचंड लोकप्रिय झाले होते. तिकिट खिडकीवर ‘आशिकी 2’ला उदंड प्रतिसाद मिळाला होता.
तूर्तास श्रद्धा ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत झळकणार आहे. याशिवाय ‘स्ट्रिट डान्सर’ हा चित्रपटही तिच्याकडे आहे. यात वरूण धवन तिचा हिरो असणार आहे.