गत 6 वर्षांपासून या गंभीर आजाराशी लढतेय बॉलिवूडची ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 13:14 IST2019-09-13T13:13:48+5:302019-09-13T13:14:36+5:30

एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देणारी ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून एका आजाराचा सामना करतेय.

Shraddha Kapoor On Battling Anxiety For 6 Years | गत 6 वर्षांपासून या गंभीर आजाराशी लढतेय बॉलिवूडची ही अभिनेत्री

गत 6 वर्षांपासून या गंभीर आजाराशी लढतेय बॉलिवूडची ही अभिनेत्री

ठळक मुद्देश्रद्धा कपूर सध्या जाम बिझी आहे. साहो आणि छिछोरे हे तिचे दोन सिनेमे नुकतेच रिलीज झाले. लवकरच ती ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात दिसणार आहे.

‘साहो’ आणि ‘छिछोरे’ असे एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या अनेक वर्षांपासून एका आजाराचा सामना करतेय. खुद्द श्रद्धाने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. गत 6 वर्षांपासून ती एंजायटीने पीडित असल्याचे तिने सांगितले.
ती म्हणाली की, ‘एंजायटी हा आजार असतो, याबद्दल आधी मला काहाही ठाऊक नव्हते. ‘आशिकी 2’ या चित्रपटानंतर  माझ्यात या आजाराची लक्षणे दिसू लागलीत. मला त्रास होत होता. पण अनेक तपासण्या करूनही मला काय झालेय, हे स्पष्ट झाले नव्हते. मला काय झालेय, हे डॉक्टरांनाही कळेना.

हे सगळेच विचित्र होते. मी वेदना सहन करत होते. पण या वेदना का व कशामुळे हे मला कळत नव्हते. यानंतर मी स्वत:च स्वत:ला हा प्रश्न विचारला आणि मला फिजिकल एंजायटीची जाणीव झाली. आजही मी या आजाराशी लढतेय. अर्थात स्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. हा आजार तुमच्या आयुष्याचा भाग आहे, हे आधी स्वीकारणे गरजेचे आहे आणि नंतर त्याच्याशी अगदी प्रेमाने निपटण्याची गरज आहे. तुम्हाला हा आजार असेल वा नसेल. पण तुम्ही कोण आणि तुम्हाला काय करायचे आहे, हे तुमचे तुम्हाला माहित असायला हवे.’


श्रद्धा कपूर सध्या जाम बिझी आहे. साहो आणि छिछोरे हे तिचे दोन सिनेमे नुकतेच रिलीज झाले. लवकरच ती ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात दिसणार आहे. यात ती वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट पुढील वर्षी 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानंतर पुढील वर्षी 6 मार्चला तिचा ‘बागी 3’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Shraddha Kapoor On Battling Anxiety For 6 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.