श्रद्धा कपूर-वरूण धवनचे 'हे' गाजलेलं गाणं पाहायला मिळणार 'एबीसीडी ३'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:50 IST2019-02-01T19:50:00+5:302019-02-01T19:50:00+5:30
श्रद्धा कपूर व वरूण धवन पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

श्रद्धा कपूर-वरूण धवनचे 'हे' गाजलेलं गाणं पाहायला मिळणार 'एबीसीडी ३'मध्ये
अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट म्हणजे एबीसीडी ३. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून टीमने पंजाबमध्ये वरूणसोबत पहिल्या शेड्युलचे चित्रीकरणदेखील पूर्ण केले आहे. श्रद्धा आणि नोरा फतेही १० फेब्रुवारीला लंडनमध्ये चित्रीकरणासाठी टीमला जॉइन करणार आहेत. यावेळेस श्रद्धा व वरूण एकमेकांच्या अपोझिट दिसणार नाहीत. तर ते दोघे स्पर्धेतील दोन टीममध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी एबीसीडी 2 चित्रपटातील एक गाणे रिप्राइज करण्याचा निर्णय घेतला आहे. बेजुबान हे गाणे पुन्हा एकदा नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या गाण्यातील डान्स स्टाईल वेगळी असणार आहे. या ट्रॅकला वरूण, श्रद्धा व रेमो स्पेशल बनवणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धा, नोरा व वरूण वेगवेगळे डान्स स्टाईल करताना दिसणार आहेत. यात क्रम्पिंग, ट्युटिंग, लॉकिंग, पॉपिंग व एफ्रो जॅजचा समावेश आहे आणि या चित्रपटातील कलाकार याचे प्रशिक्षण घेत आहेत.
'एबीसीडी ३' या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहेत. चित्रपटात श्रद्धा आणि वरूणमध्ये कोणताही रोमँटिक अँगल दाखवणार नसून चित्रपट केवळ डान्सवर आधारित असणार असल्याचे रेमोने म्हटले होते. अशात चित्रपटात श्रद्धाची भूमिका काय असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात श्रद्धा कपूर एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी ती सध्या डान्सचे धडेदेखील घेत आहे.