आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकत्र, 'गुडन्यूज' ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:01 IST2025-04-04T10:00:21+5:302025-04-04T10:01:08+5:30

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर पुन्हा एकदा एकत्र आले आहे.

Shraddha Kapoor & Aditya Roy Kapoor’s Romantic Reunion For Another Epic Love Story | आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकत्र, 'गुडन्यूज' ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकत्र, 'गुडन्यूज' ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या ऑन-स्क्रीन जोडप्यांपैकी एक आहेत.  'आशिकी२' (Aashiqui 2)  नंतर दोघेही 'ओके जानू' मध्ये एकत्र दिसले. तेव्हापासून पुन्हा एकदा दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  श्रद्धा आणि आदित्यच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'आशिकी २'मधील राहुल-आरोही ८ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून आदित्य आणि श्रद्धा एका प्रोजेक्टवर एकत्र काम करणार अशी चर्चा होती. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण, पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, नुकतंच दिग्दर्शक मोहित सुरी यांनी श्रद्धा आणि आदित्यसोबत रोमँटिक चित्रपटाच्या मूळ कथेवर चर्चा केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांध्ये प्रोजेक्टसंदर्भात स्पष्ट माहिती समोर येईल". आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी होकार दिल्यानंतर दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा पुर्ण होणार आहे.

आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर 'आशिकी २' नंतर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु, २०१५ मध्ये एका मुलाखतीत, "आम्ही दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि कायम राहू", असं श्रद्धाने म्हटलं होतं.श्रद्धा आणि आदित्यच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धाने 'स्त्री2' सारखा ब्लॉकबस्टर हिट दिला. तर आदित्यने 'द नाईट मॅनेजर' सीरिजमध्ये काम केलं. तर तो सारा अली खानसोबत 'मेट्रो इन दिनो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Shraddha Kapoor & Aditya Roy Kapoor’s Romantic Reunion For Another Epic Love Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.