NCBच्या ऑफिसमध्ये भाऊ शौविकला पाहून ढसाढसा रडू लागली रिया, लवकर संपवावी लागली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 18:57 IST2020-09-07T18:50:39+5:302020-09-07T18:57:41+5:30

चौकशी दरम्यान जेव्हा रियाचा सामना भाऊ शौविकशी झाला.

Showik chakraborty used to buy drugs for sushant singh rajput on behest of rhea chakraborty | NCBच्या ऑफिसमध्ये भाऊ शौविकला पाहून ढसाढसा रडू लागली रिया, लवकर संपवावी लागली चौकशी

NCBच्या ऑफिसमध्ये भाऊ शौविकला पाहून ढसाढसा रडू लागली रिया, लवकर संपवावी लागली चौकशी

एनसीबीने रिया चक्रवर्तीची रविवारी चौकशी वेळेच्या आधीच संपवली. मात्र प्रश्नांची मालिका संपली नव्हती. याच कारणामुळे रियाची आज पुन्हा चौकशी करण्यात आली. उद्या पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. रविवारी रियाची एनसीबीने 6 तास चौकशी केली.  ज्यात रियाने हे स्वीकार केले की, ती भाऊ शौविक चक्रवर्तीच्या माध्यमातून सुशांतसाठी ड्रग्स मागवायची. मात्र तिने ड्रग्सचे सेवन केलं नसल्याचे सांगितले. 

रियाला अश्रू अनावर
एबीपीच्या रिपोर्टनुसार, रविवारी झालेल्या चौकशी दरम्यान जेव्हा रियाचा सामना भाऊ शौविकशी झाला तेव्हा बहीण-भाऊ दोघे भावूक झाले. दोघांच्या डोळ्यातून अश्रू आले. रिया आणि शौविकच्या या इमोशनल कार्डमुळे एनसीबीला त्यांची चौकशी वेळेपूर्वीच संपवावी लागली. रिपोर्टनुसार, शौविकला पाहून रिया रडू लागली आणि शौविकच्या डोळ्यातूनही पाणी येऊ लागले. 


रियाची सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार
रियाने सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतरांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. रिया चक्रवर्ती यांनी सुशांतसिंग राजपूत यांचे बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनविण्यावरून ही तक्रार दाखल केली आहे. एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि टेल मेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईन्स 2020 अंतर्गत तक्रार दिली आहे. रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ८ जून रोजी रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या म्हणण्यानुसार, सुशांत सिंग राजपूत यांची बहीण प्रियंका सिंह हिने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुण कुमार यांच्याकडून बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन तयार करून घेतलं होतं. सतीश डॉक्टर तरुणकुमार डॉक्टरांनी लिहिलेली औषधे एनडीपीएस कायद्यांतर्गत येतात आणि त्यांच्यावर बंदी आहे.

आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, या कारणांमुळे होऊ शकते अटक

 

Web Title: Showik chakraborty used to buy drugs for sushant singh rajput on behest of rhea chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.